आधार फाऊंडेशनने अनाथ मुले, ऊस तोड कामगार, गोरगरीब कुटूंबाची दिवाळी केली गोड

 


कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण येथील आधार फाऊंडेशन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा क्षेत्रात नेहमी उल्लेखनिय काम करत असते या वेळी गोर गरीब, अनाथ मुलांना दिवाळी मिळाली पाहिजे या हेतूने आधार फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ कोळेकर यांचे मार्गदर्शना खाली एक सामाजिक उपक्रम राबवला गेला यामध्ये कोळे येथील जिजाऊ वसतिगृह येथील अनाथ मुलांना दिवाळी फराळाचे किट वाटप करून अनाथ मुलांची दिवाळी गोड करण्यात आली तर कुंभारगांव परिसरातील गोर गरीब लोकांना, पर जिल्ह्यातून ऊस तोडी साठी आलेले ऊसतोड कामगार यांचीही दिवाळी गोड केली आहे.

  सदर सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष आनंदा चोरगे, पाटण तालुका अध्यक्ष दादासो चोरगे, उपाध्यक्ष किशोर सांगावकर, अनिकेत आतकरी, केतन सांगावकर यांनी परिश्रम घेतले या सामाजिक समाजसेवेचे परिसरातून कौतुक होत आहे.