विद्यार्थ्यांनी आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन जोपासने गरजेचे आहे : प्रा सचिन पुजारी


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री संत पाचलेगावकर महाराज शिक्षणसंस्था, पोतले व शिक्षणप्रेमी शिवराम रामजी पवार विद्यालय, कालवडे या विद्यालयाचे संस्थापक संकल्पक शिक्षणप्रेमी शिवराम रामजी पवार यांच्या २९ व्या पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा सचिन पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळीं उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा सचिन पुजारी म्हणाले की, संस्थेचे संस्थापक शिक्षणप्रेमी शिवराम रामजी पवार हे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महान व्यक्तींचे प्राथ.शिक्षण पोतले, माध्य.शिक्षण टिळक हायस्कूल ,कराड आणि विंलिग्डन कॉलेज सांगली या ठिकाणी First Year Interor प्रवेश घेतला. काही महिने शिकले परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण निम्यातुन सोडुन मुबंईला गेले काही काळ गोदामात काम केले आणि नंतर पुन्हा शिक्षण पूर्ण करून रेल्वे पोलीस मध्ये नोकरीला लागले नंतर मुंबई येथे फौजदार म्हणून रिटायर झाले आणि आपल्याला मध्येच शिक्षण सोडावे लागले ही गोष्ट त्यांना कायम स्मरणात राहिली आपणास जे मिळाले नाही ते आपल्या तळागाळातील लोकांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे व उच्च शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे, गावाचे, शालेचे नाव रोशन करावे ही प्रामाणिक व निस्वार्थी भावना ठेवून मनाची खुणगाठ बांधली आणि मुलांना चांगले शिक्षणाची सोय व्हावे म्हणून श्री संत पाचलेगावकर महाराज शिक्षण संस्था पोतले याठिकाणी कालवडे गावचे सुपूत्र व पवार साहेबांचे लाडके भाच्चे श्री.टी.ए.थोरात सरांना बरोबर घेऊन शिक्षण संस्था स्थापना करून "शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही" हे ब्रिद तयार केले आणि विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले अशा महान व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून आपण देखील आपले आयुष्य समाजातील लोकांच्या हितासाठी समर्पित करावे.

शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे जसे शिक्षण हे वर्गात, चार भिंतीच्या आत मिळते तसे ते निसर्गातुन, समाजातुन ,ग्रंथामधुन आणि थोर व्यक्तींच्या जीवनातुन मिळते शिक्षकांची भुमिका, बदलते शिक्षण , नवनवीन तंत्रज्ञान, जीवन कौशल्य या बद्दल सुध्दा मुलांना माहिती उदाहरणसहित सांगितली.विद्यार्थ्यी शिकत असताना सकारात्मक दृष्टिकोन जोपासने गरजचे आहे. ध्येय मोठे ठेवून त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी सतत कष्ट करावे लागत नंतरचे आयुष्य आपले हे स्मार्ट (SMART) होत असत तसेच आपण कोणत्या परस्थितीतुन आलो आहे, मी कोण आहे ? आणि स्वतःला सिध्द करणे म्हणजे काय ? स्वयंपरीक्षण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा सचिन पुजारी यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री टी ए थोरात यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले या वेळी बोलताना ते म्हणाले की सरांनी सांगितले कि मुलांनो आपण नेहमी आपले आई वडील, गुरूजन, शिक्षक ,आपली शाळा या गोष्टीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सर्वजण आपल्याला घडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आसतात या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही जुन्या गोष्टींचा इतिहास व काही दाखले देत मुलांना त्यांच्या मनात शिक्षणप्रेमी शिवराम रामजी पवार साहेबांच्या बद्दल उजाळा देण्यात आला.

उपसरपंच शुभमराजे थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.या नंतर विद्यार्थींनी देखील भाषण केले. 

अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव श्री टी ए थोरात (भाऊ) होते. कालवडे ग्रामपंचायत उपसरपंच शुभमराजे थोरात,सुनील साठे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस पी पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री जयवंत थोरात सर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक श्री एस पी पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एस पी पाटील यांनी केले, प्रमुख पाहुणे परिचय श्री प्रमोद पवार , आभार श्री मोहिते आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ नांगरे मँडम यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी - विद्यार्थींनी , ग्रामस्थ उपस्थित होते.