रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन शिक्षकांचा सन्मान.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
"रोटरी क्लब ऑफ मलकापूर" यांच्या वतीने योग्य व प्रेरणादायी दहा प्राथमिक शिक्षकांना "नेशन बिल्डर अवॉर्ड"  ने सन्मानीत करण्यात आले. योग्य निकष कलागुण व योगदान पाहून या शिक्षकांची निवड करण्यात आली. या शिक्षकांच्या भरीव योगनानाबद्दल सत्कार करण्यात आला.

देशातील तरुण पिढीचा सर्वांगीण विकास करण्यात शिक्षकांची फार महत्वाची भूमिका व योगदान असते आणि त्यामुळे ते सशक्त राष्ट्र निर्माण करणे सक्षम होतात म्हणूनच सक्षम राष्ट्र निर्माण करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रनिर्माते म्हणून संबोधिले जाते.

या वेळी वैशाली धुमाळ, कुंभार, शोभाताई चव्हाण, संभाजी यादव, तानाजी गुजर, विक्रम पाटील, माधवी चव्हाण, सविता राजमाने, रामचंद्र तडके व मनीषा साठे यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

रोटरी इंडिया लिटरसी मिशन (आर. आय. एल. एम.) चा या कार्यक्रमाचा एक घटक म्हणजे उत्कृष्ट शिक्षकांना "नेशन बिल्डर अवॉर्ड" द्वारे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी मीना साळुंखे, मा. सभापती रमेश देशमुख, मलकापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण यादव, सेक्रेटरी राजन वेळापुरे, इलेक्ट असिस्टंट गव्हर्नर 23- 24 सलीम जी मुजावर, चार्टर्ड प्रेसिडेंट विजय चव्हाण सर्व रोटरीयन व कोळेवाडी जि प शाळा मुख्याध्यापक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज