मोबाईल अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे काळाची गरज: डी.टी.शेवाळे


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
येळगाव, ता. कराड येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण व मान्यवरांचे मार्गदर्शन असा कार्यक्रम पार पडला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डी. पी.पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतुल माने यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय कला शिक्षक सुरेश जाधव यांनी करून दिला

अभिजित खेडकर यांनी बक्षीस वितरण समारंभाचे काम पाहिले. १०वी, १२ वी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ही सत्कार व बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

तसेच श्री डी.टी. शेवाळे यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले या वेळी बोलताना ते म्हणाले कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवली. आण्णांनी लावलेले रोपटे त्याचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला दिसून येतोय. या विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . शिक्षणाबरोबर उत्तम, संस्कार, स्पर्धेमध्ये पुढे असणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य येथे होत आहे. हे मी जवळून पाहिले आहे. आजकाल विदयार्थी मोबाईलच्या आहारी जाताना दिसून येत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. 

त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळगावचे सरपंच मन्सूर इनामदार हे होते. तर प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक) होते विजय भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रमुख वक्ते माजी मुख्याध्यापक श्री डी. टी. शेवाळे , आर बी पाटील, ए. डी. पाटील , वसंतराव पाटील गुरुजी, रमेश शेटे, आजी माजी शिक्षक, ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपास्थित होते.
आभार प्रदर्शन व्ही. यु. पाटील यांनी केले.