अक्षरगणेशा उपक्रमातून मंदीर जीर्णोध्दासाठी खारीचा वाटा


डाॅ.संदीप डाकवे यांच्या स्पंदन ट्रस्टने दिली 11,111/- ची मदत

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

महाराष्ट्र राज्यातील नामवंत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत डाॅ.संदीप डाकवे यांच्या संकल्पनेतून ‘एक अक्षरगणेशा मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी’ असा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमात अक्षरगणेशा रेखाटून घेणाऱ्यांकडून मुल्य स्वीकारण्यात येत होते. या उपक्रमांतर्गत जमलेली रु.11,111/- ची देणगी मंदिर समितीकडे ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे व पदाधिकारी यांनी नुकतीच सुपुर्द केली. अशाप्रकारे अक्षरगणेशातून मदत करण्याचे हे 6 वे वर्ष आहे.  

डाॅ.संदीप डाकवे हे गेली सुमारे17 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. आतापर्यंत त्यांनी अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशनला 35 हजार, केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, विद्यार्थ्यांच्या फी साठी 6 हजार, मंदिर जीर्णोध्दारासाठी 5 हजार 555, ईशिता पाचुपते 5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना 5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस 3 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला 4 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, मंदिर जीर्णोध्दार 1 हजार, भारत के वीर या खात्यात 1 हजार अशी सुमारे एक लाखापर्यंत रोख स्वरुपात मदत केली आहे. या बरोबरच एक लाखाहून जास्त किमतीचे शैक्षणिक साहित्य विविध शाळांना दिले आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे डाॅ.संदीप डाकवे हे जाहीररीत्या कबूल करतात.

डाॅ.संदीप डाकवे यांनी 20 पेक्षा जास्त कलात्मक उपक्रम राबवत आपले वेगळेपण जपले आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा तर वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये दोनदा झाली आहे. याची दखल घेत इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी 30 पेक्षा जास्त स्पेशल रिपोर्ट प्रसारित आहेत. तर सहयाद्री दूरदर्शन वाहिनीवर अर्ध्या तासाची मुलाखत प्रसारित केली आहे

कलेबरोबर कात्रण प्रदर्शन, हस्तलिखीत पुस्तकांची मुखपृष्ठे रांगोळी, भित्तीचित्रे, बोलक्या भिंती रेखाटन अशा वेगवेगळया स्वरुपात काम केले आहे. व्यक्तिचित्राबरोबर शब्दचित्रे, पेपर कटींग आर्ट, मोरपीस, तांदूळ अशा विविध माध्यमातून त्यांनी कलाकृती साकारत आपले वेगळेपण जपले आहे. तर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, अवॉर्ड सोहळा, स्पर्धा राबवत आपले अष्टपैलूत्व सिध्द केले आहे. तसेच डाॅ.डाकवे यांनी सोशल मिडीयाच्या युगात पत्रमैत्रीचा छंद आवर्जून जपला आहे. त्यांची 500 पेक्षा जास्त पत्रे विविध वृत्तमानपत्रातून प्रसिध्द झाली आहेत. विविध सामाजिक समस्यांवर लेखन, 20 पेक्षा जास्त सेलिब्रिटींच्या मुलाखती, सुमारे 16 वर्षाहून अधिक काळ दिवाळी व इतर अंकांचे संपादन करत पत्रकारिता करत आहेत. 12 हजारहून जास्त मान्यवरांना डाॅ.डाकवे यांनी चित्रे भेट दिली आहेत. डाॅ. संदीप डाकवे यांची सात पुस्तके प्रकाशित झाली असून 5 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी 50 पेक्षा जास्त तर महाराष्ट्र शासनाने 4 पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे.

अक्षरगणेशा उपक्रमातून मंदीराच्या जीर्णोध्दारासाठी खारीचा वाटा म्हणून रु.11,111 ची देणगी देवून डाॅ.संदीप डाकवे व स्पंदन ट्रस्टने आपल्या गावाप्रती असणारी नाळ जपत अक्षरगणेशातून मदत ही परंपरा जपली आहे.

-------------------------------------------------------------

सेलिब्रिटी व इलेक्ट्राॅनिक माध्यमांकडून कौतुक :

सुप्रसिध्द अभिनेत्री दिप्ती भागवत, अभिनेते अमोघ चंदन व अन्य सेलिब्रिटी यांनी ‘एक अक्षर गणेशा मंदीरा जीर्णोध्दारासाठी’या उपक्रमासाठी व्हिडीओ संदेश पाठवून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक करत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन देखील केले होते. तसेच साम टीव्ही, लोकशाही या इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी यावर स्पेशल रिपोर्ट करत संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम पोहोचवला त्यामुळे अनेकांनी त्यात सहभाग घेतला. त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रीया स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली.

---------------------------------------------------------------