स्त्रियांचा सन्मान ही सुसंस्कृत समाजाची ओळख आहे : डॉ. महेश गायकवाड


कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड( हजारमाची) या विद्यालयात नवरात्र उत्सवानिमित्त शारदीय व्याख्यानमालेचे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते. यावर्षी या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्रा. सुरेश यादव, प्रा.आण्णासाहेब पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जी.बी. देशमाने, शिक्षक आर. एम. अपिने, लोकरे ए. एल. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, स्त्री ही अबला आहे असे समाज नेहमी बोलतो परंतु वास्तव खूप वेगळे आहे. आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावरती कार्यरत आहे. भवानी माता ही शौर्याचे, लक्ष्मी हे पैशाचे आणि सरस्वती ही शिक्षणाचे प्रतीक असून पुरुषप्रधान संस्कृतीत त्यांचे नेहमी पूजन केले जाते आता तेच स्थान स्त्रीयांनी स्वकर्तृत्वावर प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने कार्य करावे, आत्मविश्वास गमावला की न्यूनगंड तयार होतो. तुमच्या मनात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. ज्याप्रमाणे आग आपल्या उष्णतेच्या साह्याने सोन्याला उजळून टाकते अगदी त्याचप्रमाणे स्वयंशिस्त कोणत्याही विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व चमकविण्यात महत्त्वाचे भूमिका बजावते म्हणून यश गाठायचे असेल तर स्वयंशिस्त हवी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देशमाने जी.बी, पाहुण्यांचा परिचय आर. एम. अपीने, सूत्रसंचालन सौ. पानवळ एम.बी. तर आभार श्री.जाधव ए.ए. यांनी मानले.