स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या कुटूंबियांचे विविध मान्यवरांकडून सांत्वन

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे (तात्या) यांचे आकस्मित निधन झाले. सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांचे ते वडील होत. राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डाकवे कुटूबियांची भेट घेवून सांत्वन केले व त्यांना मानसिक आधार दिला.

शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, जि.प.साताराचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती संजय देसाई, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके, उद्योजक सर्जेराव यादव, विटा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सारिका सपकाळ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सर्जेराव टकले, पोलीस निरीक्षक एन.आर.चौखंडे, प्रा.ए.बी.कणसे, डाॅ.राहूल पाटील, डाॅ.अजय सपकाळ, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, सुरेश जाधव, टीव्ही 9 चे पत्रकार दिनकर थोरात, दै.पुढारीचे उपसंपादक अशोक मोहने, संदीप चेणगे, ह.भ.प.रामदास महाराज, मर्चंट सिंडीकेटचे अध्यक्ष अनिल शिंदे, जनसहकारचे मारुती मोळावडे, सुभेदार मेजर शंकर जाधव, सुभेदार जगन्नाथ शिद्रुक, कुमजाई पर्व चे संपादक प्रदीप माने, पत्रकार पोपट माने, कुस्ती निवेदक सुरेश जाधव, धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप, समस्त शिवसमर्थ परिवार यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेवून डाकवे कुटूंबियांचे सांत्वन केले.

तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, प्रा.ए.व्ही.देशपांडे, सुनील पवार चाफळ यांनी शोकसंदेशाव्दारे, महंत स्वामी आबानंदगिरीजी महाराज, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, प्राचार्य डाॅ.जे.एस.पाटील, डाॅ.राजेंद्र कंटक, दै.नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव यांनी दूरध्वनीव्दारे संवाद साधन सांत्वन करुन धीर दिला. तर रक्षाविसर्जनप्रसंगी वसंत डाकवे, अनिल डाकवे, कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण, आदर्श सरपंच रविंद्र माने, विठ्ठलराव पाचुपते, अॅड.विठ्ठलराव येळवे, देवबा वायचळ सर, विलासराव येळवे, जे.वाय.मोरे सर, ह.भ.प.धोंडीराम महाराज यांनी श्रध्दांजली वाहून स्व.राजाराम डाकवे यांच्याविषयींच्या भावना व्यक्त केल्या.

प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्ती तसेच व्हाॅटसअप, फेसबुक, सोशल मिडीया याव्दारे सांत्वन करुन कुटूंबाला धीर दिल्याबद्दल या सर्वांचे डाकवे परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे.