दीपावली उत्साहत व पर्यावरणपुरक साजरी करु या

दीपावलीनिमित्त जिल्हावासीयांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या शुभेच्छा.सातारा, दि.22 : पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हावासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन, यंदाची दीपावली मोठ्या उत्साहात, फटाकेविरहीत, पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करून प्रदूषण टाळू या, असे आवाहनही श्री. देसाई यांनी केले आहे.

शुभेच्छा संदेशात पालकमंत्री म्हणतात, एकल प्लॅस्टिकचा वापर न करणे आणि पर्यावरणाला पोषक होईल अशा पध्दतीने आपण ही दीपावली साजरी करु या. मोठ्या आवाजांचे, प्रदुषण करणारे फटाके टाळुया अशी ही पर्यावरण पुरक दीपावली साजरी करुन जिल्ह्यातील नागरिकांचं आरोग्यसुध्दा चांगल्या पध्दतीने जोपसण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या दीपावलीपासून आपण सगळेजण सुरु करु या.