अनिल डाकवे यांची पाटण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
काळगाव विभागातील डाकेवाडी गावचे सुपुत्र, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पाटणचे कार्याध्यक्ष अनिल डाकवे यांची पाटण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

सत्यजितसिंह पाटणकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. या पूर्वी अनिल डाकवे यांनी डाकेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ही काम केले आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या काळगाव विकास सेवा सोसायटीमध्ये अनिलदादा यांनी आपला करिश्मा दाखवला. सोसायटीमध्ये सत्तांतर करण्यात त्यांनी आपला मोलाचा वाटा उचलेला. त्याची दखल घेवून पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पदी त्यांना संधी देण्यात आली.

त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. काळगाव व कुंभारगाव विभागातील कार्यकर्त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.