श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे औषध निर्माण दिन उत्साहात साजरा.


उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे जागतिक औषध निर्माण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विविध आजार, त्याची लक्षणे व त्यावरील उपाय व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी रांगोळी स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते. 

या औषध निर्माता दिनानिमित्त श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव श्री प्रसुन जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.