खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील (बाबा) यांच्या शुभहस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ.
संस्थेच्या चार वर्षाच्या अहवालाचे प्रकाशन करताना मान्यवर.
तळमावले तालुका पाटण येथील जनसहकार पतसंस्थेचा ४ था वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या प्रगतीच्या चार वर्षाच्या अहवालाचे प्रकाशन व सभासदांना वाहन वितरण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी चार वर्षाच्या संस्थेच्या अहवालाचे निरीक्षण करून संस्थेच्या प्रगतीबद्दल व पारदर्शक कारभाराबद्दल संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे व संस्थेच्या संचालकांचे कौतुक केले. संस्थेने चार वर्षात येथील जनतेचा, सभासदांचा, ठेवीदारांचा पारदर्शक कारभारामुळे विश्वास संपादन करून 24 कोटी रुपयेचा संमिश्र व्यवसाय केला आहे यावरून संस्थेने सभासदांच्या जिंकलेल्या विश्वासाची प्रचिती येते. संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळवडे यांचे योग्य नियोजन, सहकारातील अभ्यास व पारदर्शक कारभार यामुळे संस्थेची प्रगती वेगाने होत आहे. त्यांच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा.
संस्थेच्या वतीने स्वागत करताना चेअरमन मारुतीराव मोळावडे व व्हा. चेअरमन अमोल मोरे
संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील (बाबा) यांचा बुके देऊन संस्थेच्या वतीने सत्कार केला.
यावेळी चेअरमन मारुतीराव मोळावडे म्हणाले जनसहकार चा ४ था वर्धापनदिन आज सर्व सभासद, ठेवीदार हितचिंतक यांच्या उपस्थितीने उत्साहत साजरा होत आहे. संस्थेने चार वर्षात २४ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय केला आहे हे फक्त शक्य झाले जनतेच्या, सभासदांच्या, ठेवीदारांच्या विश्वासार्हतेमुळे. जनतेचा संस्थेवरील विश्वास व पारदर्शक कारभारामुळे संस्था सहकारात भक्कमपणे उभी आहे यामुळे दिवसेंदिवस संस्थेची नेत्रदीपक प्रगती होत आहे.यापुढेही सर्वांचे सहकार्य असेच राहो हीच सदिच्छा. संस्थेच्या या प्रगतीसाठी खा. श्रीनिवास पाटील पाटील साहेब व सारंग पाटील बाबा यांचे सदैव मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. यावेळी भविष्यात संस्थेचा शाखा विस्तार करण्याचा मनोदय ही चेअरमन मारुतीराव मोळावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
सभासदांना वाहन वितरण करताना खा.श्रीनिवास पाटील व सारंग पाटील बाबा.
संस्थेच्या या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, राजकीय व सहकारातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये ढेबेवाडीचे पोलीस निरीक्षक संतोष पवार, पाटण पंचायत समिती चे विद्यमान सभापती प्रताप भाऊ देसाई, अॅड. विठ्ठलराव येळवे (नाना), अशोकराव पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती कराड, आनंदराव कचरे चेअरमन, कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्था मुंबई, रघुनाथराव जाधव माजी सभापती पंचायत समिती पाटण, डॉ.संदीप डाकवे अॅड.ए.टी.सुतार,अॅड.एल.बी.पाटील, इसाकभाई आतार निवृत्त अधिकारी कराड नगरपालिका, विकास कदम सरकार खोडशी प्रगतशील शेतकरी, बी.बी.ढालाईत प्रमाणित लेखापरीक्षक, इकबाल भाई सुतार, राजूभाई पटेल, पापाभाई पटेल, अकबर भाई मोमीन, शब्बीर भाई मुल्ला, सुभाषराव चिंचकर ऑटो कन्सल्टंट, सौ.रुपाली कदम माजी सरपंच मोरेवाडी ग्रामपंचायत, रमेश नावडकर तात्या सरपंच करपेवाडी, बाजीराव मोरे विद्यमान सदस्य मोरेवाडी ग्रामपंचायत, विष्णू सपकाळ नाभिक संघटना तालुकाध्यक्ष, धनाजी चाळके, दत्ता भिलारे, विभागातील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व संचालक मंडळ, कर्मचारी प्रतिनिधी वृंद, वांग खोऱ्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, एलआयसी प्रतिनिधी, सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, संस्थेचे व्हा. चेअरमन अमोल मोरे, संचालक सुनील आडावकर, प्रशांत पोतदार, मिलींद ताईगडे, सचिन ताईगडे, आनंदा माने, काशीनाथ जाधव,सुतार साहेब सर्व संचालक सल्लागार व सेवक वर्ग उपस्थित होते.