धुमाळ कुटूंबियांनी पुण्यस्मरणा निमित्त अनाथ वारकरी मुलांची दिवाळी केली गोड.

 

  तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगांव वायचळवाडी ता पाटण येथील कै हिराबाई लक्ष्मण धुमाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त धुमाळ कुटूंबियांनी समाजासाठी एक नवीन आदर्श व दिशा देत सामाजिक बांधिलकी जोपासत अनाथ वारकरी मुला, मुलींची दिवाळी गोड केली काळगांव ता पाटण येथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गवळीवाडा येथील जय हनुमान अनाथ मुला, मुलींचे वारकरी शिक्षण संस्था व मुटलवाडी येथील मुला, मुलींना ब्लॅंकेट, व दिवाळीचा गोड फराळ देऊन एक नवीन आदर्श घडवला. 

या वेळी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. राजाराम पांडुरंग माने म्हणाले या संस्थेची स्थापना काही वर्षा पूर्वी झाली गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटाने सर्व धार्मिक कार्यक्रम बंद झाले होते आता निर्बध शिथिल झाले आहेत आज रोजी संस्थेकडे 32 मुलांनी अँडमीशन घेतले असून त्यातील 20 मुले सद्या आध्यत्मिक शिक्षण घेत आहेत त्यामध्ये हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन कसे करावे याचे मार्गदर्शन व प्रॅक्टिस करून शिक्षण दिले जाते ही मुले शालेय शिक्षण घेत सायंकाळ च्या वेळेत अध्यात्मिक शिक्षण घेतात गेले चार महिन्यातच 5 मुले एक मुलगी कीर्तन करू लागलेत ही बाब माझ्या साठी अभिमानाची आहे आपण पाहिले तर आषाढी वारी साठी महाराष्ट्र राज्या पेक्ष्या इतर राज्यातील लोक दिंडीत सहभागी होतात सध्या सांप्रदायाकडे लोकांचा कल कमी होताना दिसत आहे. 

ग्रामीण विभागात याचे प्रमाण जास्त असून आपण या संस्थेच्या माध्यमातून नवीन पिढीतील मुले तयार व्हावी यासाठी प्रयत्न करत असून या साठी समाजातून मुलांनी पुढे येण्याची काळाची गरज आहे या कलियुगात मोबाईलच्या वापराने लहान मुले भरकटत असून त्यांचेवर योग्य संस्कार करण्याची ताकत अध्यात्मातच आहे याची जाणीव पालकांनी घेण्याची गरज आहे आज या संस्थेमध्ये 4 देशी गाई आहेत त्यामध्ये वाढ करून 100 करून त्याचे शेणा पासून अगरबत्ती, दुधा पासून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करण्याचा भविष्यात विचार आहे याच मुटलवाडीतून आषाढी वारी साठी 500 वारकरी सहभागी होतात वारीसाठी पंढरपूरला पायी दिंडीने जातात. यावेळी देवबा धुमाळ, शिवाजी धुमाळ, बाळकृष्ण धुमाळ, सुरेश धुमाळ, तुकाराम धुमाळ, अशोक धुमाळ, संतोष धुमाळ, महेंद्र धुमाळ, संदीप धुमाळ, अरविंद धुमाळ (फौजी)गणेश धुमाळ सुनील धुमाळ, राजेंद्र धुमाळ, गौरव धुमाळ, आकाश धुमाळ, सुनील वायचळ (सर)किशोर साळुंखे, विश्वास पवार, माणिक खटावकर, राजेंद्र पुजारी उपस्थित होते.                        _______________________________

जय हनुमान अनाथ मुला, मुली वारकरी शिक्षण संस्थेच्या मुले, मुलींनी उपस्थितांचे "गुरुर ब्रह्म गुरुर्र विष्णू गुरुर्र देवो महेश्वरा, गुरुर्र साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः असे म्हणत स्वागत केले त्यावेळी त्यांचे चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला.

__________________________________