महाभोंडला कार्यक्रम उत्साहात संपन्न. उत्सव नवरंगाचा व उत्सव आदिमायेचा


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
काकासाहेब चव्हाण महाविद्यालय,तळमावले ता पाटण येथे सांस्कृतिक विभागा अंतर्गत खास नवरात्र उत्सवानिमित्ताने स्त्री शक्तींचा जागर सबंध महाराष्ट्रात चालू आहे.

स्त्री देवतांची पुजा करून, स्त्रीयांमध्ये दडलेले प्रेम, करूणा, दया, ऊर्जा इ.ओळखुन तसेच सन्मानकरून उत्सव नवरंगाचा आणि उत्सव आदिमायेचा ही थीम घेऊन महाविद्यालयातील मुलींच्या सुप्तकलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अरूण गाडे साहेब सदैव तत्पर असतात.

प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाभोंडला कार्यक्रमाची सुरुवात हस्तदेवता पुजनांनी झाली. हस्तदेवता पुजन शुभहस्ते महाविद्यालयाची माजी विद्यार्थींनी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आणि महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सिताई उद्योग समुहाच्या संस्थापिका अध्यक्ष सौ.कविताताई कचरे यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात कविताताई यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांनी गुलाब पुष्प व झेप अंक देऊन करण्यात आला. 

यावेळी कविताताईंनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थींनी मनमुराद आनंद घेऊन सुप्त कलागुणांना जागृत करण्याचे ठिकाण म्हणजे महाविद्यालयातील सांस्कृतिक व्यासपीठ असते या व्यासपीठावररून आपले जीवन समृध्द होण्यास मदत होते व व्यक्तीमत्वाचा देखील विकास होत असतो आणि भरभरून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ अरूण गाडे यांना गुलाब पुष्प देऊन ज्यु विभाग प्रमुख प्रा आर एस जाधव सरांनी स्वागत केले. 

याकार्यक्रमात दांडिया नृत्य,गरबानृत्य इ.वेगवेगळ्या गीत सादर करून मनमुराद पणे महाभोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला यासाठी महाविद्यालयातील महिला गुरूदेव कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला यामध्ये प्रा.डॉ.उषादेवी साळुंखे, प्रा.सौ.मिनाक्षी पाटील, प्रा सौ बी.एस.सालवाडगी, प्रा सौ जे.व्ही.बाऊचकर, प्रा सौ डॉ जे.यु.मुल्ला, प्रा.डॉ.हाके, प्रा.सौ.कुंभार एस एस, प्रा.सौ.वर्षाराणी पाटील, प्रा.सौ.कार्वेकर ए बी, प्रा.सौ.पिसाळ एस पी, प्रा.कु.कदम मँडम, श्रीमती वीर मँडम, इ. प्राध्यापक भगिनींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमात शिक्षकेत्तर कर्मचारी यांची देखील मोठी मदत लागली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ यु.ई .साळुंखे मँडम यांनी केले. सुत्रसंचालन प्रा सौ बी एस सालवाडगी मँडम यांनी केले तर आभार प्रा सौ मिनाक्षी पाटील मँडम यांनी मानले.