पाटणकरांना धक्का; मोरगिरीत ६० वर्षांनी सत्तांतर, ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री शंभुराज देसाईंचा करिश्मा

पाटण तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे घवघवीत यश.




पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यामध्ये माहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचातींमध्ये भिलारवाडी,सुतारवाडी,मान्याचीवाडी,मोरगिरी व घाणव या ग्रामपंचातयींचा समोवश होता. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी,सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोरगिरी व शिरळ गणातील घाणव या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली होती. आज मतमोजणी झाल्यानंतर निवडणुक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये मोरणा विभागातील मोरगिरी या ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 60 वर्षानंतर सत्तांतर करत तालुक्यातील पाच पैकी चार ग्रामपंचायतीवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आली.

           पाटण तालुक्यातील भिलारवाडी, सुतारवाडी, मान्याचीवाडी, मोरगिरी व घाणव या ग्रामपंचातयींचा या ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी,सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.तर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायतीची निवडूण लागली होती.या निवडणूकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली गावातील युवा वर्गाने भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे गेले होते.ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांनी मोरगिरी गावामध्ये केलेल्या विकास कामांचा घरोघरी प्रचार करत पहिल्यापासून निवडणूकीमध्ये चूरस निर्माण केली होती. या निवडणूकीमध्ये सरपंच म्हणून सौ.अर्चना किरण गुरव या 307 मतांच्या फरकाने विजयी झाल्या.तसेच विठ्ठल वार्ड क्र.1 मध्ये सचिन कृष्णाजी मोरे,श्रीमती सरिता कृष्णत कुंभार, सौ. वैशाली सचिन मोरे गणेश वार्ड क्र. 2 मधून संदिप गजानन सुतार, सौ.सुनिता सुरेश गुरव तर जोतिर्लिंग वार्ड क्र.3 मधून श्री. जगन्नाथ परशराम माने,सौ.निर्मला रावसाहेब चव्हाण हे सात उमेदवार विजयी झाले.विजयी उमेदवार व कार्यकर्ते यांनी दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांची भेट घेतली. यावेळी मा.यशराज देसाई (दादा) यांनी विजयी उमेदवारांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.विजयी उमेदवारांचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू, बशीर खोंदू,मा.पंचायत समिती सदस्य सौ.निर्मला देसाई,नथूराम कुंभार गणेश भिसे यांनी अभिनंदन केले.निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्याठी सी.डी.केळकर (काका), विलास कुंभार, राजेंद्र साने, राघू भाईंगडे, रंगा झांजुगडे, संजय कानडे, पंढरीनाथ मोरे, संतोष मोरे, महेश कुंभार, बळीराम कुंभार, दशरथ पवार, अशोक नाडेकर, मोहन कोळेकर, धनाजी मोहिते, लक्ष्मण मोरे, सतिश कदम, प्रकाश पवार, प्रविण कुंभार, बाळू केळकर, भगवान कुंभार, शामराव कुंभार, प्रकाश गुरव, सचिन लाड, संदिप नाडेकर, सचिन मोरे, युवराज चव्हाण, महेंद्र सरनोबत, अर्जुन चव्हाण, पंढरीनाथ मोरे, मारुती कुंभार, महादेव सरनोबत, किशोर गुरव तसेच मुंबई व पुणे रहिवाशी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.