आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांच्यात कौशल्ये यावीत, ते सर्वगुणसंपन्न असावेत हा हेतू साध्य करण्यासाठी आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटण (केंद्रशाळा मुले -1) येथे केले होते.

या कार्यशाळेला महाराष्ट्र हायस्कुलचे कराडचे कलाशिक्षक माळी आर. एस यांनी या मार्गदर्शन केले. मुलांना सोप्या पद्धतीने व हसत खेळत कंदील कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक करुन दाखवत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत 96 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विधार्थ्यांनी सुंदर आणि छान छान असे आकाशकंदील बनवले होते. यावेळी मुलांचे चेहरे आनंदाने खुलले होते. सदर कार्यशाळेत शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापिका सौ.गेजगे मॅडम या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. आकाश कंदील कार्यशाळा अतिशय उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. जाधववर मॅडम यांनी केले.