कुंभारगांव ता.पाटण येथील दीपक चव्हाण यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन लक्ष्मी किसान पतसंस्थेची स्थापना केली या पतसंस्थेचे उदघाटन श्री.ष.प्र.108 पद्मभास्कर डॉ.निळकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज (अधिमठ संस्थान धारेश्वर ता पाटण )यांचे शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ठेव पावती, पासबुक यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक संस्थेचे मार्गदर्शक आनंदराव चव्हाण यांनी केले या वेळी बोलताना ते म्हणाले की या संस्थेचे कामकाज दिमाखदार करू पुढील वर्षी याच संस्थेच्या नवीन शाखा उदघाटनाला आपण उपस्थित राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या नंतर पाटणच्या सहायक निबंधक गितांजली कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले बोलताना त्या म्हणाल्या संस्थेचे कामकाज आज पासून सुरु होत असून संस्था ज्या जोमाने जोडली आहे त्या प्रकारे संस्थेची प्रगती व्हावी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत पुढील काळात जिल्हाभर वाढ व्हावी अश्या शुभेच्छा दिल्या.
या नंतर डॉ नीलकंठ शिवाचार्य महास्वामी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की लक्ष्मी किसान नागरी पतसंस्थेचे उदघाटन झाले असे मी जाहीर करतो या उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने पाटणच्या निबंधक गितांजली ताई मॅडम ह्या उपस्थित आहेत त्याच बरोबर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, संस्थेचे संचालक उपस्थित सभासद, ठेवीदार, ज्यांनी मुदत ठेव, त्याचबरोबर सेव्हिंग खाते काढले आहे अशा सर्व सभासदांना अनंत आशीर्वाद व्यक्त करतो.
खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये धर्म शास्त्रात सांगितले आहे संचिता "अंती विन शती "साठवलेला पैसे नष्ट होतो तस व्हायच पूर्वी लोक हंडया मध्ये पैसा जमिनीत पुरून ठेवायचे ते पुरून ठेवलेले नातवाला कळायचे नाही आणी आजोबांची संपत्ती निघून जायची आता चागंली सोय झाली आहे तुम्ही काय कोणाच्या नावावर ठेव ठेवली आहे याची सर्व माहिती पतसंस्था व्यवस्था असल्याने आता "संचिता अंती विनशती "संचित अर्थी विविर्थती "तुम्ही साठवलेला पैसा वाढत राहतो आणी वाढलेली संपत्ती कोणाला द्यायची त्याला मिळते कदाचित त्याची नोंद केली नसेल तर त्याची गंगाजळी होते याचा अर्थ ती राष्ट्राच्या कार्यामध्ये येत असते एखाद्या घरातला निर्वंशाची जमीन ग्रामपंचायतीकडे जाते त्यांचा उपयोग सामूहिक उपयोगाला येते त्याच प्रमाणे एखाद्याची वारस नोंद झालेली नसेल तर त्याची रक्कम तशीच ती अनेकांच्या उपयोगाला येते त्या वेळी जे सदस्य असतील ते त्या रकमेचे मालक झालेले असतात पर्यायाने आपण या बँकेचे,संस्थेचे सदस्य होतो तेव्हा आपली संस्था असते आपण भाऊ, भाऊ असतो प्रत्यक्ष रित्या माझे मी खाऊ अशी परस्थिती असते तेव्हां गंगाजळी राहते तेव्हा ती सर्वांना मिळते तेव्हा आपण भाऊ, भाऊ होतो वास्तवीक खऱ्या अर्थाने तो सहकार आहे सहकारात असा कायदा निर्माण झाला पाहिजे तुम्ही दिलेल्या रक्कमेचा 1, 2 टक्के सर्वांच्या उपयोगी आले पाहिजेत एखादा सदस्य किंवा त्यांचा नातेवाईक आजारी आहे अशा वेळी त्याला पैसे देण्याची वेळ आहे अश्या वेळी सर्वांच्या निधीतून पाच, दहा हजार गेले पाहिजेत आपण फक्त "बिना सहकार नही उद्धार "कर्जदार कर्जा साठी संस्थेत अनेक वेळा येतो त्या नंतर संस्थेला त्याचेकडे जावे लागते संस्थेच्या वतीने चैत्र शुद्ध सप्तमीला ज्यांना आई, वडील नाहीत त्यांना सायकल, कपडे, अन्य वस्तू उपयोगाच्या दान कराव्यात या कारणाने संस्था उत्तरोउतर वृद्धिगत होईल आर्थिक व्यवहार करतात त्यांना उत्तरोउतर धनलक्ष्मी प्राप्त होवो शेतकऱ्यांचे कल्याण होवो हि भावना व सर्व उपस्थित मान्यवर यांना अनंत आशीर्वाद करतो
यावेळी उपस्थितांचे आभार संस्थेचे चेअरमन दीपक चव्हाण यांनी मानले, यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव, संचालक, बा.दे.सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, पोलीस पाटील अमित शिंदे, माणिक खटावकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, सोसायटी माजी चेअरमन भिमराव चव्हाण, सोसायटी चेअरमन रामराव इनामदार, ईश्वर मोरे, ग्रामस्थ, सभासद बहू संख्येने उपस्थित होते
या उदघाटन पर सोहळ्यास ढेबेवाडीचे स.पो.नि संतोष पवार, सातारा जिल्हा परिषद चे अर्थ, शिक्षण, माजी सभापती संजय देसाई, राष्ट्रवादी पाटण तालुका उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, वाळवा कृषी बोर्डाचे अध्यक्ष शशिकांत शेळके, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅकटर धनाजी चाळके आदींनी भेटी दिल्या..