पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक.

आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत दिले जाणारे ऑनलाईन दाखले व सेवा दोन दिवसात देण्याचा अभिनव उपक्रम.पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
सामान्य नागरिकांच्या तक्रारी व दाखले अर्जावर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्य सरकार कडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला त्यानुसार पाटण तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्वाधिक प्रमाणात आपले सरकार सेवा केंद्र मार्फत दिले जाणारे ऑनलाईन दाखले व सेवा दोन दिवसात देण्याचा अभिनव उपक्रम पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी सुरू केला आहे आणि दोन दिवसात सर्व शासकीय दाखले देण्यास सुरुवातही केली आहे. या अभिनव उपक्रमाचे तालुक्यातील जनतेने स्वागत व कौतुक केले आहे.

याबाबत बोलताना तहसीलदार रमेश पाटील म्हणाले हा सेवा उपक्रम सेवा पंधरवड्यापुरता मर्यादित न राहता तालुक्यातील जनतेचे व सेवा देण्याची तत्परता यापुढे ही अशीच चालू ठेवण्यात येईल. तसा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

     पाटणचे प्रातांधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रमेश पाटील यांनी हा अभिनव उपक्रम राबवला. हा उपक्रम सुरू केल्यापासून तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांचेकडून समाधान व्यक्त होत आहे यापुढेही सर्व प्रकारचे शासकीय दाखले जास्तीत जास्त दोन दिवसात निपटारा करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याने पाटण तालुक्यातील डोंगर दऱ्यातील जनतेकडून तहसीलदार यांचे आभार मानन्यात येत आहेत.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज