भाजपच्या सेवा पंधरवडा उपक्रमांअंतर्गत तळमावले येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
तळमवले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर जन्मदिन ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या कालावधीत भाजप देशभर सेवा पंधरवडा साजरा करत आहे या पंधरवड्या निमित्त तळमावले तालुका पाटण येथे भाजपाच्या वतीने उद्या रविवार दिनांक 2 ऑक्टोबर २२ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

यामध्ये खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल, आरोग्यासाठी मोफत रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन, सिताई महिला पतसंस्थेमार्फत बचत खाते शुभारंभ तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम होणार आहे. 

तसेच बांधकाम कामगार नोंदणी अभियान उपक्रमही राबविण्यात येणार आहे. विभागातील बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करून घ्यावी.

खाद्यपदार्थाच्या विविध स्टॉलचे उद्घाटन सकाळी 10 वाजता कृषी कन्या कुसुमताई करपे व ताईगडेवाडी सरपंच सौ. शोभाताई भुलुगडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या खाद्य स्टॉलवर खाद्याचा आनंद लुटण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

तसेच मोफत रक्त तपासणी व आरोग्य शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले चे वैद्यकीय पथका मार्फत वैद्यकीय तपासणी होणार आहे. 

सिताई महिला पतसंस्थेमार्फत अवघ्या शंभर रुपयांमध्ये बचत खाते सुरू करता येणार आहे व नवरात्र उत्सवानिमित्त सिताई ठेव पावतीवर 0.5 टक्के ज्यादा व्याज ठेवीदारांना देण्यात येणार आहे या संधीचा सुद्धा सभासदांनी, ठेवीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिताई महिला पतसंस्था व सिताई उद्योग समूहाच्या प्रमुख कविताताई कचरे यांनी केले आहे.

होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील व यशवंतराव चव्हाण फाउंडेशन चे अध्यक्ष संजय सावंत उपस्थित राहणार आहेत.

या विविध कार्यक्रमाचे आयोजन सिताई फाउंडेशनच्या प्रमुख व माजी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ कविताताई कचरे यांनी केले आहे.