सिताई फाउंडेशनच्या वतीने सिताई नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महिला सक्षमतेसाठी व महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी सिताई फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील असते. सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे या सिताई महिला बचत गट व सिताई फौंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतात.

नवरात्र व भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवढा निमित्त सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव दुर्गांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा मा. महिला जिल्हा अध्यक्षा कविताताई कचरे यांनी दिली आहे. सिताई नवदुर्गा पुरस्काराने महिलांना गौरवण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमासाठी भाजपच्या राष्ट्रीय नेत्या चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य भरत पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रम पावस्कर, कराड दक्षिण महिला तालुका अध्यक्षा डॉ. सारिका गावडे, पाटण तालुका अध्यक्ष सागर माने, उमेद पाटण तालुका समन्वयक प्रतिभा चिंचकर, उमेद काळगांव विभाग समन्वयक अमित पाटील यांची ही कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात खालील नव दुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे. भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्या सुनिशा शहा, समाजसेविका सीमा घारगे, उद्योजिका राधिका पन्हाळे, मधुमक्षिका पालन रोहिणी पाटील, पत्रकार सरीता घारे, पत्रकार विद्या नारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखाताई देशपांडे, नवभारत इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका प्रिती गुरव , खंडाळा बांधकाम कामगार संघटिका वनिता शिर्के , वेद सामाजिक संस्था मसूरच्या अध्यक्षा दिपाली खोत यांचा समावेश आहे.

या वेळी अंगणवाडी सेविका, आशा सेविका व बचत गटातील महिलांचा देखील सन्मान होणार आहे. 

अंगणवाडी सेविका विमल माने व सुरेखा कुराडे, आशा सेविका वैशाली यादव, प्राजक्ता देवळेकर व सुनिता ताईंगडे , कराड दक्षिण युवती प्रमुख सुरेखा माने, बचत गटामधून शुभांगी भुलुगडे व रुपाली यादव यांचा समावेश आहे.

सदर कार्यक्रम उद्या दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. तळमावले येथे आयोजित केला आहे.

तरी या गौरव सोहळ्यासाठी विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिताई फाउंडेशनच्या अध्यक्ष कविता कचरे यांनी केले आहे.