"जन सहकार" निधीची विश्वासार्हतेची व पारदर्शक कारभाराची 4 वर्ष पूर्ण. आज चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न होत आहे.

वर्धापदिनानिमित्त खा. श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती.



ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सहकाराचे जाळे भक्कमपणे उभे आहे. विभागात अनेक सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाले आहे. यामध्ये अल्पावधीतच प्रसिध्द झालेली व आपल्या पारदर्शक कारभाराने जनतेचा विश्वास संपादन करून सहकारात एक वेगळी उंची गाठलेली सहकारी संस्था म्हणजे 'जनसहकार निधी' होय.

आज २६ ऑक्टोबर जनसहकार चा ४था वर्धापन दिन.चार वर्ष पारदर्शक कारभार करत जनसहकार ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 

बँकिंग क्षेत्रातील नवनवीन बदल स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत जनसहकार निधी लिमिटेड देत असलेल्या सेवा-सुविधांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. संचालक मंडळ, कर्मचारीवृंद यांचे बहुमोल योगदान व जनतेचा भरभरून मिळणारा विश्वास याच जोरावर जनसहकार आज प्रगतीच्या शिखरावर पोचली आहे.

 या संस्थेकडे काही काळातच कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या व या ठेवींच्या भक्कम आधारावर विभागातील, तालुक्यातील गरजूंना, छोट्या उद्योग व्यवसायांना पतपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे मोठे कार्य या जन सहकार संस्थेच्या माध्यमातून या संस्थेचे चेअरमन वांगखोऱ्याचे सुपुत्र मारुतीराव मोळवडे व त्यांच्या संचालक मंडळींनी केले.

 अगदी कमी वयात सहकाराचा गाढा अभ्यास करून या क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे हे व्यक्तिमत्त्व आज दूरवर परिचित आहे. यामागे कठोर परिश्रमाबरोबरच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची त्यांची धडपडच दिसून येते. 

 समाजसेवेची आवड आणि गावच्या विकासाचा ध्यास मनात असल्याने केवळ नोकरीत न रमता आपल्या सहकारातील ज्ञानाचा व प्रदीर्घ अनुभवाचा समाजासाठी वापर व्हावा, यासाठी मारुती मोळावडे यांची नेहमीच धडपड असते. याच जाणिवेतून व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार व गरजूंना आर्थिक साह्य व पाठबळ देवून त्यांचे जीवन समृद्ध घडविण्यासाठी त्यांनी व्यापार व इतर क्षेत्रातील तज्ज्ञ सहकाऱ्यांना सोबत घेऊन 4 वर्षांपूर्वी तळमावले येथे जनसहकार निधी लिमिटेड या संस्थेची स्थापना केली. झपाट्याने विस्तारत असलेल्या व शहरीकरणाकडे वाटचाल सुरू असलेल्या तळमावलेच्या विकासात अनेक घटक योगदान देत असून त्यामध्ये जनसहकारचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.



अल्पावधीतच या संस्थेने प्रगतीची गरुडभरारी घेतली आहे. संस्थेकडे १५ कोटींच्या ठेवी असून साडेसतरा कोटींचा एकत्रित व्यवसाय संस्थेने केला आहे. आर्थिक क्षेत्रातील विश्वासार्ह व पारदर्शक कारभार याचबरोबर 'जनसहकार' सामाजिक उपक्रमातूनही अग्रभागी आहे. गरजूंना व आपत्तीग्रस्तांना मदत करत संस्था सामाजिक बांधिलकी मनोभावे जपताना दिसते आहे. अतिवृष्टीच्या काळात संस्थेने दरडग्रस्त व नुकसानग्रस्तांना दिलेला हात लाखमोलाचा ठरला. दुर्गम व डोंगराळ ठिकाणी संस्थेचे संचालक, पदाधिकारी यांनी स्वतः पोचून आपद्ग्रस्तांना मानसिक आधाराबरोबरच सहकार्याचाही हात दिला. संस्थेमार्फत जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. संस्थेने आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे समाजातील विविध स्तरातून मोठे कौतुक होत आहे. संस्थेच्या तळमावले येथील मुख्यालयास आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून तेथील विनम्र, तत्पर व आधुनिक नवनवीन सेवा - सुविधांचे तोंडभरून कौतुक केले आहे. विविध आर्थिक संस्था तसेच बँकिंग क्षेत्रात 'जनसहकार'ने स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 

संस्थेमार्फत 'आपले सरकार सेवा केंद्र' चालवले जात असून विविध प्रकारचे शासकीय दाखले, सुविधा त्याव्दारे नागरिकांना मिळत आहेत. एकाच छताखाली अनेक आधुनिक सुविधा पुरविण्यात संस्था यशस्वी झालेली आहे. लाईट बिल स्वीकृतीसह एसएमएस बँकिंग, कोअर बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, फोन बँकिंग, इंटरनेट बँकिंग, चेक क्लिअरिंग, बिल भरणा, डिमांड ड्राफ्ट, सीसीटीव्ही सुरक्षा आदी दर्जेदार सेवा-सुविधा ग्राहकांना पुरविल्या जात आहेत. संस्थेच्या दैनंदिन मुदत, रिकरिंग, लक्षाधीश, पेन्शन, भविष्यकल्याण आदी ठेव व बचत योजनांना तसेच प्रॉपर्टी मॉर्गेज, महिलांसाठी व्यवसाय कर्ज, व्यावसायिक कर्ज, सोने तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, एलआयसी पॉलिसी तारण कर्ज आदी कर्ज योजनांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जनसहकार निधी लिमिटेडने अनेकांना आर्थिक पाठबळ देत स्वबळावर उभे केले आहे. 

 संस्थेचे मुख्यालय तळमावले येथे असून तज्ज्ञ व अनुभवी स्टाफ आणि संपूर्ण संगणकीकरण यामुळे संस्थेच्या कारभारात अधिक तत्परता व पारदर्शकता आलेली आहे. वांग खोऱ्यातील एक विश्वासार्ह संस्था म्हणून जनसहकारची स्वतंत्र ओळख आहे.  

 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती मोळावडे, व्हा. चेअरमन अमोल मोरे यांच्यासह संचालक सचिन ताईगडे, मिलिंद ताईगडे, संदीप टोळे, प्रशांत पोतदार, आनंदा माने, काशिनाथ जाधव, महेश कोकाटे, संजय माटेकर, सुरेखा नलवडे, निर्मला मोळावडे, तज्ज्ञ संचालक, लेखा परीक्षक महंमद हानिफ सुतार, व्यवस्थापिका सुरेखा मुळगावकर तसेच सर्व सल्लागार, कर्मचारी, सभासद, मित्रपरिवार संस्थेच्या प्रगतीत योगदान देत आहेत.

_________________________________

जनसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन स्थापन झालेल्या या संस्थेने अवघ्या ४ वर्षांत घेतलेली प्रगतीकारक झेप ही चोख, पारदर्शक कारभार व विश्वासार्हतेची पोच आहे. संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या दर्जेदार सुविधांचा लाभ ग्राहक घेत असून संस्थेच्या आर्थिक पाठबळावर अनेक कुटुंबे स्वबळावर उभी राहात असल्याचा मोठा आनंद आम्हाला आहे. यापुढच्या काळातही आणखी नवनवीन सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे सेवा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेच्या तसेच ग्राहक व व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव शाखा विस्ताराचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणिवेतून बांधिलकी जपण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे.

- मारुतीराव मोळावडे 
संस्थापक / चेअरमन - जनसहकार उद्योग समूह
_________________________________