21 ऑक्टोबर.....वाढदिवस नव्हे, स्पंदन कृतज्ञता दिवस


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
21 ऑक्टोबर, 2014 हा चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याचा जन्मदिवस. यावरुनच पुढे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टची संकल्पना अस्तित्वात आली. स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करण्याचा मनोदय डाकवे परिवाराने केला. स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांचे समाजसेवेचे बाळकडू पुढे मुलांच्यात उतरले.

‘‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’’ अशी टॅगलाईन घेवून डाकवे परिवार त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाचे अनाठायी खर्च टाळून त्यातून समाजाला दिशा देणारे उपक्रम राबवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नातूनच आज 7 वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. यामध्ये स्पंदनच्या प्रथम वाढदिवसादिवशी भेटवस्तूऐवजी जमा झालेली रक्कम रु.35,000/- ‘नाम’ फाऊंडेशनला दिली आहे. दुसऱ्या वाढदिवसाला रु.5,000/- आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला जमा केले आहेत. तिसऱ्या वाढदिवसाला स्पंदनची ग्रंथतुला करुन जमलेली रु.11,000/- ची सर्व पुस्तके जि.प.शाळेला दिली आहेत. चौथ्या वाढदिवसाला दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य दिले आहे. पाचव्या वाढदिवसाला शांताई फाऊंडेशन ला रु.5,000/- किमतीचे जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. सहाव्या वाढदिवसानिमित्त रु.6,000/- गरजू विध्यार्थी यांची शैक्षणिक फी भरली आहे तर सातव्या वाढदिवसाला जुळेवाडी (ता.कराड) येथील श्री बालाजी मतिमंद मुलांच्या निवासी शाळेस ‘ज्ञानाची शिदोरी’ देवून या विध्यार्थी प्रती जिव्हाळा जपण्याचे काम केले आहे. अशाप्रकारे चि.स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत एका वेगळया उपक्रमाने साजरा केला आहे.

विशेष म्हणजे या प्रत्येक उपक्रमात लोकांचा सहभाग खूप मोठा होता. त्यामुळेच हे सर्व उपक्रम यशस्वी झाले आहेत.

काही दिवसापूर्वीच स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांचे आकस्मिक निधन झाले. डाकवे परिवार अजूनही त्यातून पुरता सावरलेला नाही. त्यामुळे कुटूंबावर दुःखाची छाया आहे. म्हणून ते यंदा स्पंदनचा वाढदिवस साजरा करणार नाही परंतू त्याच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा तशीच अबाधित ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर हा स्पंदनचा वाढदिवस उत्सव न होता तो ‘‘स्पंदन कृतज्ञता दिन’’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय डाकवे परिवाराने घेतला आहे.

दिवाळीच्या अनुषंगाने यावर्षी गरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी कीट/फराळ वाटप करणार आहेत. गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी, त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आपणाला यात सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी डाकवे परिवाराकडे संपर्क करा.

आपल्या सुचना, मार्गदर्शन यांचे स्वागत आहे. आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्पंदन आणि आमच्या परिवाराच्या पाठीशी आहेत ते अधिक वृध्दिंगत व्हावेत अशी अपेक्षा यावेळी डॉ. संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.