तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.

 


 तळमावले कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

तळमावले ता पाटण बिट मधील कुंभारगाव ता पाटण येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत साजऱ्या केल्या जाणाऱ्या पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.  

  सहा महिने ते तीन वर्ष, तीन वर्ष ते पाच वर्ष या वयोगटातील सदृढ बालक,बालिका स्पर्धेत 14 गावातील 28 बालकांची निवड करण्यात आली. 

यावेळी कुंभारगाव सरपंच सारिका पाटणकर, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पाटण 2, च्या सुपरवायझर कुसुम दिक्षिती, अरुंधती गरुड यांच्या हस्ते उपस्थित बालक व पालकांना पारितोषिक देण्यात आले. अंगणवाडी स्तरावर शासनाने दिलेल्या निकषांनुसार सहा महिने ते तीन वर्ष तसेच तीन वर्ष ते पाच वर्ष या दोन वयोगटामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील बालक व त्यांच्या पालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यापैकी 14 गावातून 28 बालकांची सदृढ बालक म्हणून निवड करून त्यांना बक्षीस देण्यात आले. 

या कार्यक्रमास कुंभारगावच्या सरपंच सारिका पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य वैशाली गुरव,गुढे ग्रामपंचातीच्या उपसरपंच अश्विनी शिबे, गावातील बालक, पालक, महिला अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.