शिक्षक हा सामाजिक ज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. ते समाजाला समृद्ध व सुसंस्कृत बनवण्याचे महान कार्य करतात : शेेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ)


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती,थोर विचारवंत व शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान असलेल्या गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार करावा या हेतूने 05 सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णनांचा जन्मदिन श्री मळाई देवी शिक्षण संस्था व श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था, जखिणवाडी यांच्या संंयुुक्त विद्यमाने आदर्श जुनियर कॉलेज मलकापूर ता.कराड येथे मलकापूर,कराड परिसरातील ज्ञानदानाचे कार्य करणारे आजी माजी शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष _संस्थापक सचिव श्री मळाई देवी शिक्षण संस्था, मलकापूरचे श्री.अशोकराव थोरात (भाऊ) यांनी आपल्या मनोगतात म्हटले की," शिक्षक हा सामाजिक ज्ञानाचा केंद्रबिंदू आहे.ते समाजाला समृद्ध व सुसंस्कृत बनवण्याचे महान कार्य करतात." शिक्षक हा गुरु असतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था, जखिणवाडी यांच्याकडून गेेली 30 वर्षापासून मलकापूर व कराड परिसरातील सर्व शिक्षकांचा सन्मान व सत्कार करत आहे. यावर्षी सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचा व सेवानिवृत्त अशा एकूण 1270 शिक्षकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.सौ.स्वाती थोरात यांनी केले.याप्रसंगी त्यांनी श्रीमळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची सामाजिक कार्यातील बांधिलकी व पतसंस्थेचे कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव थोरात (भाऊ )यांच्या हस्ते संपन्न झाले.

           समारंभात संस्थेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती व त्यांच्या कार्याची माहिती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सामाजिक,राजकीय व शैक्षणिक कार्याचा आढावा आपले मनोगतात घेतला. यामध्ये श्री.एस.एस. धोंगडे (आदर्श ज्युनि. कॉलेज, मलकापूर )कु. एस. एच .माने (ना. आ. च. विद्यालय, मलकापूर )सौ.के. ए. शिर्के (प्रे.च. कन्याशाळा, मलकापूर) कु. रोशन डिसूजा ( स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, मलकापूर), श्री.हेमंत शिर्के (आदर्श प्राथमिक विद्यालय, मलकापूर )व श्री.रफिक सुतार (आदर्श प्राथमिक विद्यालय, आगाशिवनगर)  

           कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाटण तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री.बाजीराव शेवाळे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचे कार्य किती महान आहे हे व्यक्त केले. तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक थोर समाज सुधारक,विचारवंत व समाजाचा समन्वय साधण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडले पुढे ते म्हणाले,"नैतिकता, चारित्र्य ही दोन अंगे शिक्षकांचे भूषण आहे." 

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .एस .ए .पाटील व सौ .एस .डी .खंडागळे यांनी केले तसेच पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापिका सौ.ए .एस.कुंभार यांनी केली. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार शामराव पवार (संचालक श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी यांनी केले. 

   याप्रसंगी संस्थेतील सर्व विद्यालयांचे शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील आजी माजी शिक्षक,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती अधिकराव घाडगे (घाडगे इरिगेटर्स,कराड), मा.श्री. संतोष शेट्टी (उद्योजक मलकापूर), मा.श्री.दत्तात्रय श्रीपती जाधव( माजी सरपंच, उंब्रज), मा. श्री. राहुल आवटे (उद्योजक , कार्वे), मा. श्री.प्रकाश देसाई (उद्योजक आगाशिवनगर), मा. श्री. राहुल पाटील (उद्योजक मलकापूर), मा. श्री. सुहास जाधव (व्हा. चेअरमन) व मा. श्री. सर्जेराव शिंदे, सचिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.