जगातील नवनिर्मितीमध्ये शास्त्रज्ञा बरोबर इंजिनिअर चा सिंहाचा वाटा आहे. डॉ. संजय पुजारी.

 

घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

इंजिनिअर हे समाज आणि विज्ञान यांच्यातील दुवा आहेत जगातील नवनिर्मितीमध्ये शास्त्रज्ञा बरोबर इंजिनिअर चा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन कल्पना चावला सायन्स सेंटरचे डायरेक्टर डॉ. संजय पुजारी सर यांनी व्यक्त केले. 

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी  डॉ. संजय पुजारी सर प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीटेक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सर होते.

या राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे उद्घाटन डॉ.  संजय पुजारी यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी प्रमुख अतिथी डॉ. संजय पुजारी यांचे महाविद्यालयाच्या वतीने डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

तर प्रा.भाग्यश्री पाटील यांनी डॉ संजय पुजारी सर यांचा परिचय करून दिला व त्यांच्या चालू असलेल्या उपक्रमांची महिती सांगितली.या राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संजय पुजारी म्हणाले कोरोना सारख्या महा भयानक संकटात शास्त्रज्ञाने अहोरात्र कष्ट करून आपले सर्व कौशल्य, बुद्धिमत्ता पणाला लावून, प्रचंड परिश्रम करून सर्व जगाला तारणारी कोरोना प्रतिबंधक लस निर्माण केली व कोरोनाला हद्दपार करून करोडो लोकांना जीवदान दिले हे खूप मोठे कार्य होय.

शास्त्रज्ञांचे राष्ट्रासाठी असणारे महत्त्व यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात असणाऱ्या लहान मोठ्या वस्तूंचे शोध कसे लागले कोणत्या शास्त्रज्ञाने लावले याची अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली. साध्या सायकल पासून विमानापर्यंतच्या शोधांची विस्तृत माहिती यावेळी त्यांनी दिली.  स्वप्नांकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे जिद्द, धैर्य होय या डॉ. कल्पना चावला यांच्या ब्रीद वाक्याची आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. स्वानंद कुलकर्णी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आजच्या या राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे उद्घाटन आज ज्यांच्या हस्ते झाले ते कराड येथील डॉ.कल्पना चावला सायन्स सेंटरचे डायरेक्टर आहेत. त्यांना लहानपणापासूनच सायन्स ची आवड होती व या ध्येयवेडातूनच त्यांनी कराड येथे डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटरची उभारणी केली व या सायन्स सेंटर मधून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायन्सच्या विद्यार्थ्यांना हे डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटर जणू वरदान ठरले. सरांचे सायन्स मधील कार्य खूप मोठे आहे व या कार्याचा गौरव शासनानेही वेळोवेळी पुरस्कार देऊन केला आहे. अनेक पुरस्कार प्राप्त डॉ. संजय पुजारी यांच्या मार्गदर्शनातून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा लाभ झाला हे सुद्धा खूप मोठे कार्य होय.

राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, ब्रिज मेकिंग कॉम्पिटिशन, इनोव्हेटिव्ह आयडिया प्रेझेंटेशन या स्पर्धा यावेळी उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेमधून 

 जिल्ह्यातून इतर कॉलेजमधूनही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा पाटील यांनी केले तर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार प्रा. राधा गोसावी यांनी मानले.