आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

आधार फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक, कला,क्रिडा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन करण्यात येते . गरजू लोकांना धान्याचे किट वाटप, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप असे अनेक उपक्रम राबवले जातात.

नुकतेच ड्रायव्हर दिन या दिवसाचे अवचित्य साधत तळमावले येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शासकीय, खाजगी वाहन, ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे ASI मारुती चव्हाण सहकारी प्रशांत चव्हाण, आधार फाऊंडेशनचे पाटण तालुका अध्यक्ष दादासो चोरगे, उप अध्यक्ष किशोर सागावकर,आनंदा चोरगे ,कार्याध्यक्ष सातारा जिल्हा रविराज मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.