मलकापूर येथे महाराष्ट्र चहा भवनचा शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या हस्ते उदघाटन समारंभ संपन्न.


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मलकापूर ता कराड येथे श्री शिरीष गाडे यांनी नव्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र चहा भवनचा उदघाटन समारंभ महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या हस्ते संपन्न  झाले.
 या वेळी बोलताना अशोकराव थोरात म्हणाले की वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अनेक तरुण जिद्दीने पुढे येत आहेत व आपला व्यवसाय आधुनिकतेने वाढवत आहेत महाराष्ट्र चहा हा आसाममध्ये सुद्धा लोकप्रिय होऊ शकतो. या समारंभास गाव गुंता गाजीव चे आनंद चव्हाण व सर्व टीम तसेच पी जी पाटील, भास्कर पाटील, वसंतराव चव्हाण तुळशीराम शिर्के, प्राचार्या सौ अरुणा कुंभार, प्रा. शीला पाटील, प्रमोद शिंदे ,अधिकराव बोरगे अरुण शिंदे ,सर्जेराव शिंदे, अनिल पवार ,प्रकाश गाडे  व गाडे यांचा मित्र परिवार यांची प्रमुख उपस्थिती होती .प्रास्ताविक एस वाय गाडे यांनी केले. सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले तर आभार शिरीष गाडे यांनी मानले.
Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
सातारा जिल्ह्यातील संवादाचे जाळे अधिक मजबूत होणार : खा. श्रीनिवास पाटील
इमेज
जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल: नरेंद्र अण्णासाहेब पाटील
इमेज