सध्याच्या पिढीने मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे तरच वाचन संस्कृती वाढेल: प्रा. डॉ. हनमंतराव कराळे.

 

घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

सध्याची नवीन पिढी मोबाईल मध्ये आपला किमती वेळ घालवत असते. मोबाईल शिवाय आजच्या मुलांना चैन पडत नाही. ही शोकांतिका आहे. असे प्रतिपादन श्री शिवांजली फाउंडेशन मलकापूरचे सीईओ -प्रा. डॉ. हनमंतराव कराळे यांनी केले.

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांना ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले आजच्या पिढीने मोबाईलचा अतिरेक वापर टाळून वाचन अधिक प्रमाणात वाढविले पाहिजे तरच वाचन संस्कृती वाचेल व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल.

आजच्या युवकांनी महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास, समाज सुधारक यांच्या जीवन कहाणी पासून प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे, यासंदर्भात विविध उदाहरणे, संदर्भ आणि गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.

 कॉलेजच्या प्राचार्या सौ पुष्पा पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीचे बुके देऊन ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्वागत केले.

 सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. 

 यावेळी श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या सौ सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेजच्या सहशिक्षिका सौ सुनिता सुतार यांनी केले.आणि आभार प्रदर्शन कु. अंकिता थोरात यांनी केले. 

 कार्यक्रमास सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मोलाचा सहभाग आणि सहकार्य होते.