सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्नासंदर्भात राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी करणार : मंत्री शंभूराज देसाई

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.


पाटण कृष्णाकाठ वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या उसाला एफ. आर.पी. प्रमाणे योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे.राज्य शासन सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.सध्या देशात ८५ लाख टन साखर शिल्लक आहे मात्र केंद्र सरकारकडे सहकारातील अद्याप ही काही प्रलंबित प्रश्न असून हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे आग्रही मागणी केली आहे असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.दरम्यान राज्यातील भाजप -सेना युतीचे हे सरकार राज्यातील सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे ही मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

                  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पार पडली. यावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, अशोकराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,शशिकांत कदम,सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सुनील पानस्कर,सर्जेराव जाधव,संचालिका श्रीमती जयश्री कवर,सौ.दिपाली पाटील,बबनराव शिंदे,मधुकर पाटील,विजयराव जंबुरे,अभिजित पाटील,सुरेश पानस्कर,ॲङमिलिंद पाटील,चंद्रकांत पाटील, प्रकाशराव जाधव, मधुकर पाटील यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

              यावेळी बोलताना मंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफ.आर.पी. प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे,याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफ आर पी चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणा संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. साखर निर्याती संदर्भातील केंद्राने अडचणी दूर केल्यास राज्यातील साखर कारखानदारी अडचणीतुन बाहेर येण्यास मदत होईल.त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच यासंदर्भात केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. मंत्री ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातील भाजप सेना युती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टीतुन निर्माण झालेल्या आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे,अशी ग्वाही देवुन मंत्री ना.देसाई म्हणाले प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफ.आर.पी.देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे.

यशराज देसाई यांनी, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. सध्या हे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्याचे असून पहिल्या टप्प्याचे काम ऐंशी टक्के झाले असून उर्वरित वीस टक्के काम पूर्ण करणार आहे. तसेच, दुसर्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. कारखान्या च्या या विस्तारीकरणामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. ही वाढ झाल्यास सभासद शेतकर्यांच्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत होण्यास मदत होणार आहे. यंत्रणेच्या तुटवड्याबाबत बोलताना ते म्हणाले, यंत्रणेचा तुटवडा हा केवळ देसाई कारखान्यालाचं नव्हे तर राज्यातील सर्व कारखान्यांना मध्ये आहे. मात्र यावरती तोडगा काढण्यासाठी देसाई कारखान्याचा हायवेट्ररच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने देशातील साखरेच्या निर्यातीवरती बंदी घातल्याने अनेक कारखानदारांना साखरेचा कोटा शिल्लक असताना ही निर्यात बंदी मुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी एफ आर पी शंभर टक्के देण्यात आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र देसाई कारखाना येत्या दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना एफ आर पी ची शंभर टक्के रक्कम देण्यासाठी कटीबद्ध असणार आहे असं सांगितले.

           दरम्यान या सभेत विषयपत्रिकेवरील आणि ऐनवेळेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली यामध्ये,मंत्री शंभूराज देसाई यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून आणि यशराज देसाई यांची लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.दरम्यान कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

___________________________________

सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो

महाराष्ट्राला नवी दिशा देताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचे नंदनवन केले आणी खऱ्या अर्थाने तालुका उभारला मात्र पाटणकरांनी लोकनेत्यांना धोका दिला. ज्यांना बोटाला धरून राजकारणात आणले त्यांच्याशी दगाबाजी केली गेली.संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करून बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकनेत्यांच्या विरोधात कट कारस्थाने, दगाबाजी केल्याने लोकनेते शेवटच्या निवडणूकित सहा हजार मतांनी निवडून आले. मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे दोन नंबरचे पद लोकनेत्यांचे होते. ज्यांनी दगाबाजी केली त्यांच्या मांडींला मांडी लावून आम्ही कदापी बसणार नाही.मात्र अडीच वर्षे तोंड धरून बुक्क्यांचा मार सहन करीत आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो. मात्र त्यानंतर सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो.अशी जोरदार टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

___________________________________