श्री संतकृपा इंटरनॅशनल जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कल्पना चावला सायन्स सेंटरला भेट


घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा 

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंटरनॅशनल जुनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी सायन्स च्या विद्यार्थ्यांनी कराड येथील कल्पना चावला सायन्स सेंटरला नूकतीच भेट दिली. 

विज्ञान केवळ पुस्तकात न ठेवता आपल्या आयुष्याचा भाग बनवणारे लोक दुर्मीळ असतात. या दुर्मीळ लोकांपैकी एक म्हणजे प्रा. डॉ.संजय पुजारी. आपल्या विज्ञानवेडातून त्यांनी कराडला डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केलं असून येथे विविध शाळांतली मुलं तिथे स्वतः प्रयोग करून विज्ञान शिकतात आणि त्यांना विज्ञानाची गोडी लागते. विज्ञानाचा ‘पुजारी’ असलेल्या या तरुणाची नि त्याने उभारलेल्या विज्ञान केंद्रा ला श्री संतकृपा इंटरनॅशनल जुनियर कॉलेज घोगाव येथील इयत्ता बारावी तील विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि दिवसभरात वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोग व अनुभूती यांचा आनंद घेतला. विविध वैज्ञानिक संकल्पना दैनंदिन प्रयोगातून तसेच जादूच्या खेळांतून आणि प्रसंगी गीत गायनातून सादर करण्यात आले यामध्ये, पुजारी सर यांचे सहकारी प्रमोद सर आणि चिन्मय सर यांचे मोलाचे सहकार्य व सहभाग होता. 

 श्री संतकृपा संस्थेने मुलांसाठी दिलेली ही एक अनोखी भेट विज्ञान भेट ठरली यामध्ये संतकृपा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ पुष्पा पाटील आणि शिक्षक स्टाफ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज