श्री राजाराम डाकवे यांचे दुःखद निधन. चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांना पितृशोक.

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

डाकेवाडी काळगाव (ता.पाटण) येथील श्री राजाराम विठ्ठल डाकवे यांचे आज सोमवार दि.१२ सप्टेंबर 2022 रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय ६८ वर्षे होते. ‘तात्या' या नावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी,तीन नाती, दोन नातू ,  सुना, असा मोठा परिवार आहे. 

स्वर्गीय.राजाराम विठ्ठल डाकवे हे प्रसिद्ध चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांचे वडील होत.

त्यांचा रक्षाविसर्जन विधी बुधवार दि.१४ सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता डाकेवाडी काळगाव ता.पाटण, जि.सातारा येथील वैकुंठधाम येथे होणार आहे. स्वर्गीय.राजाराम विठ्ठल डाकवे हे एक उत्तम शेतकरी, समाजप्रिय, अध्यात्माची आवडअसणारे,सामाजिक बांधिलकी जोपासणारे,मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज