काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावलेचा प्रकाशित होणारा वार्षिक नियतकालिक ' झेप ' अंकाला समृद्ध, गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. या नियतकालिक लेखनातून प्रारंभ करुन अनेक विद्यार्थ्यांनी साहित्यिक, पत्रकार, चित्रकार इतर कलांमध्ये पुढे नावलौकिक मिळवतात. 

सामाजिक बांधिलकी जपणारा यावर्षीचे वार्षिक नियतकालिक 'झेप 'चा अंक वेधक व प्रेरणादायक झाला आहे असे प्रतिपादन माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती संजय देसाई यांनी केले. ' झेप ' वार्षिक नियतकालिक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.        

 संजय देसाई पुढे म्हणाले, यावर्षीच्या 'झेप 'अंकाचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे मुखपृष्ठ खूप कलात्मक झाले आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख महत्वपूर्ण आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते. या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. अरुण गाडे म्हणाले वांग खोऱ्याच्या मातीत दातृत्वाची भावना आहे. अनेक दानशूर जाहिरातदारांच्या आर्थिक पाठबळामुळे अंकनिर्मिती करणे सुलभ झाले आहे. 'झेप 'अंकातून विद्यार्थांच्या साहित्यिक कलागुणांना वाव दिला जातो. या कार्यक्रमास मर्चंट सिंडीकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेचे संस्थापक अनिल शिंदे , सामाजिक कार्यकर्ते सखाराम माटेकर बापु , कुमजाई पर्वचे संपादक प्रदीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गवराम पोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी यांनी केले व आभार प्रा.महेश चव्हाण यांनी मानले.