केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा सचिव यांची स्‍वस्‍त धान्‍य दुकान व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास भेट


सातारा, दि.16 : केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठाचे सचिव सुधांशु पांडे यांनी आज समर्थनगर, एम.आय.डी.सी. सातारा येथील श्री. ए. बी. पिंगळे यांच्या स्‍वस्‍त धान्‍य दुकानास भेट दिली. या भेटीमध्‍ये सचिवांनी दुकानाची पहाणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधला व समाधान व्‍यक्‍त केले.        

         दुकान अत्‍यंत नीटनेटके व स्‍वच्‍छ ठेवलेले असून लाभार्थ्यांना धान्‍याचे योग्यरित्या वाटप होत आहे. सर्व नोंदी अत्‍यंत व्‍यवस्थित ठेवलेल्या आहेत. या दुकानाबाबत लाभार्थी अत्‍यंत समाधानी आहेत असे अभिप्राय सुधांशु पांडे यांनी यावेळी व्यक्त केले.

            यावेळी उपायुक्‍त (पुरवठा) पुणे विभाग पुणे त्रिगुण कुलकर्णी, जनरल मॅनेजर मनमोहन सिंग सारंग, जिल्‍हा पुरवठा अधिकारी स्‍नेहा किसवे-देवकाते, सहा.जिल्‍हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुनिल शेटे, पुरवठा निरीक्षक संतोष दळवी, इ. उपस्थित होते.

या दौऱ्याप्रसंगी केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठाचे सचिव सुधांशु पांडे यांनी सातारा एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनलाही भेट दिली.


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज