श्री मळाईदेवी पतसंस्थेची दहा टक्के लाभांश परंपरा कायम : शेतीमित्र अशोकराव थोरात.

 कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था सातारा जिल्ह्यातील विशेषता कराड तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून सहकार क्षेत्रात नावारुपास आली आहे. हजारो सभासद, हजारो ठेवीदार, हजारो कर्जदार यांचे सहकार्याने संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था प्रगतीपथावर आहे सहकारात नाव लौकिक प्राप्त आहे. असे प्रतिपादन शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी लाभांश वाटपाच्या वेळी सभासद, उपस्थित मान्यवर, संचालक यांना मार्गदर्शन करताना केेले.

      सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा लाभांश वाटपाचा कार्यक्रम पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दि.26/09/2022 रोजी घटस्थापने दिवशी संपन्न झाला.

      सहकार क्षेत्रामध्ये संचालक मंडळ व अधिकारी वर्ग यांच्या गैरकारभारामुळे काही थोड्या संस्था अडचणीत येतात. परंतु शासनाच्या सहकार खात्याने वेळीच हस्तक्षेप करून अनेक संस्था वाचवल्या आहेत. तरी सुद्धा सहकार क्षेत्राचे राजकीयकरण , घराणेशाहीस व खाजगीकरणास चाप लावणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्राकडे खुली अर्थव्यवस्था व जागतिकीकरणाचे मोठे आव्हान आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे शिक्षण- प्रशिक्षण घेऊन चांगला पगार देऊन बुद्धिमान व सक्षम कर्मचारी अधिकारी भरणे गरजेचे झाले आहे. सभासद व संचालक मंडळांचे वरचेवर प्रबोधन करणे तितकेच गरजेचे आहे.

      लाभांश वाटप प्रसंगी मळाई देवी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन सुहास जाधव, मलकापूर नगरपरिषद मलकापूरचे विरोधी गट नेते अजित थोरात, पी.जी.पाटील ,वसंत चव्हाण, दत्तात्रय लावंड,मारुती रावते, सौ मंगल कुंभार,दगडू पवार, अनिल कृष्णत शिर्के, रमेश शिर्के, राजाराम शिर्के, दिलीप शिर्के, अनिल निवृत्ती शिर्के, शेखर शिर्के, आनंदराव शिंदे, पंडित शिंदे, श्रीरंग मोरे, कृष्ण मोरे, जयवंत फुके, संस्थेचे सचिव सर्जेराव शिंदे, सर्व कर्मचारी सर्व मान्यवर संचालक मान्यवर सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.