ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मालदन व मालदनच्या इतर वाडीतील अनेक विकास कामांना मंजुरी.

मालदन| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

पाटण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असणारे गावचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन काम करणारे पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी 

राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते,पुल, वीज, नळपाणीपुरवठा योजना यासह विविध विकासकामे तळागाळापर्यंत पोहोचवली आहेत. 

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नव्याने विकास कामाचे प्रस्ताव मागवून ते मंजुरही करून घेतले आहेत. यामध्ये मालदन या गावातही अनेक विकास कामे मंजूर केली आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

 पानवळवाडी- खळे रस्त्यावरील शिवेच्या ओढ्यावरील फरशी पुलाचा निम्मा भाग पुराने वाहून गेला होता. व हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता याचे गांभीर्य लक्षात घेऊन व लोकांची भविष्यातील गैरसोय लक्षात घेऊन ना.शंभुराज देसाई यांनी येथील साकव पुलासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसेच मालदन - बंडेवाडी वरचेआवाड येथील साकव पुला करिता राज्य शासनाच्या 3054 योजनेअंतर्गत 30 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच मालदन ते 'वरचेआवाड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे' याकरिता 25 लाख,तर 'मालदन ते बौद्ध वस्ती रस्ता  खडीकरण व डांबरीकरण करणे याकरिता 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काही दिवसातच या मंजूर विकास कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती मालदन येथील शिवसेनेचे कार्यकर्ते जोतिराज काळे यांनी दैनिक कृष्णाकाठशी बोलताना दिली. या विकास कामास मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांची भविष्यातील गैरसोय दूर होणार आहे त्यामुळे मालदन, पानवळवाडी, जाधववाडी, बंडेवाडी, वरचेआवाड,टेळेवाडी येथील ग्रामस्थांनी नामदार शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत.

 

  

Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज