'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण


श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार समितीकडे मदत सुपूर्द करताना डाकवे परिवारातील सदस्य.

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे ऊर्फ तात्या यांचे नुकतेच निधन झाले. तात्यांच्या अचानक जाण्याने डाकवे परिवाराला अतीव दुःख झाले. तरीही तात्यांचा समाजसेवेचा, मदतीचा, कर्तुत्वाचा वारसा जोपासत डाकवे परिवाराने अनाथ, निराधारांना स्नेहभोजन देत मायेचा घास भरवण्याचा प्रयत्न केला आहे.  'उत्तर' कार्याचा विधी करत 'माणुसकी' जपली आहे. बनवडी (ता.कराड) येथील अश्विनीताई वेताळ-पाटील यांनी शांताई फौंडेशन च्या माध्यमातून भुकेल्या पोटाची भूक भागवण्यासाठी "फूड बँक"सुरू केली आहे. यामधून निराधार, अनाथ मुलांना स्नेहभोजन दिले जाते.  शांताई फौंडेशन च्या या फूड बँकेला मदत करत दुःखातही डाकवे परिवाराने सामाजिक ऋण जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. 

याशिवाय श्री दत्त मंदिर डाकेवाडीच्या जीर्णोद्धारासाठी "फुल ना फुलाची पाकळी" म्हणून डाकवे परिवाराने रु.5,555/- ची देणगी मंदिर जीर्णोद्धार समितीकडे सुपूर्द केली आहे. यावेळी समितीचे तुकाराम डाकवे (आबा), पांडुरंग जाधव तसेच परिवारातील श्रीमती गयाबाई डाकवे, डॉ.संदीप डाकवे, रेश्मा डाकवे, भरत डाकवे, गौरी डाकवे, विठ्ठल डाकवे, सुमन डाकवे, विश्वनाथ डाकवे, वनिता डाकवे, सविता निवडूंगे, नंदा डाकवे, नंदा चिंचुलकर, अश्विनी डाकवे, ज्योती पाटील, रत्ना काळे, स्पंदन डाकवे, हरिबा डाकवे, लक्ष्मण डाकवे, ज्ञानदेव डाकवे, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे, जिजाबाई मुटल, सुनील मुटल आणि डाकवे परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते. 

विशेष म्हणजे डाकवे परिवाराने राजाराम डाकवे यांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले आहे.

यापूर्वी ही डाकवे परिवाराने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. वडील स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांचे संस्कार आणि शिकवण यामुळेच अशा प्रकारचे उपक्रम राबवणे शक्य होते अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ.संदीप डाकवे यांनी यावेळी दिली आहे.

पारंपरिक रूढी, रीतिरिवाज परंपरा जपत नाविन्याचा ध्यास घेत 'उत्तर' कार्याला 'माणुसकी' जपत सामाजिक ऋण फेडण्यासाठी राबवलेला उपक्रम स्तुत्य असाच आहे. त्याचप्रमाणे श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. रामदास महाराज यांच्या हरिकीर्तनाचे आयोजन केले आहे. डाकवे परिवारावर दुःखाची छटा असताना सामाजिक ऋण फेडण्यासाठी राबवलेले उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत. समाजाने अशा उपक्रमाचे अनुकरण करावे. 





  शांताई फौंडेशन ला डाकवे परिवाराने दिलेल्या मदतीतून निराधार, अनाथ यांना अन्नदान करताना फौंडेशन चे सदस्य.