ब्रिलियंटचे एम.एच.टी-सीईटी व नीट परीक्षेत दैदिप्यमान यश


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
ब्रिलियंटच्या कोरोना काळातील केवळ ४७ विद्यार्थ्यांच्या अत्यल्प विद्यार्थी संख्येच्या बॅच मधून अतिशय उत्कृष्ट निकाल दिला आहे. त्यामध्ये ९ विद्यार्थ्यांच्या Advance च्या बॅचमधून ७ विद्यार्थ्यांना आय.आय.टी. मध्ये प्रवेश मिळाला आहे. तर १३ विद्यर्थ्यांच्या नीट बॅचमधून ८ विद्यार्थी ५००च्या पुढे आहेत. व २५ विद्यार्थ्यांच्या सी.ई.टी. बॅचमधून ६ विद्यार्थी ९९ पर्सेंटाइलच्या पुढे आहेत. व ३ विद्यार्थ्यांच्या आर्किटेक्चर बॅचमधील ३ही विद्यार्थी एम.पी.ए. सारख्या भारतातील सर्वोत्तम आर्किटेकचर कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहेत. मर्यादित विद्यार्थी संख्येचा विद्यार्थी आवडीनुसार स्वतंत्र वर्ग असणाऱ्या ब्रिलियंटने उत्कृष्ट निकालाची परंपरा कोरोना काळातही कायम राखली आहे. एम.एच.टी.-सीईटी या परिक्षेत ब्रिलियंट अकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे ९९% पर्सेंटाइलच्या पुढे 6 विद्यार्थी (कोरोना काळातील अत्यल्प विद्यार्थी संख्येतून) उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
पाटील तनुजा ९९.६३%पर्सेंटाइल 
गावडे तेजस ९९.४८% पर्सेंटाइल
भांबूरे आशिष ९९.२९% पर्सेंटाइल
मोरे शैलेष ९९.०९% पर्सेंटाइल
जगदाळे आदित्य ९९.११% पर्सेंटाइल
देसाई ऋतुजा ९९.०८% पर्सेंटाइल 
साळुंखे शिवाली ९८.८५% पर्सेंटाइल
आडके स्वप्निल ९७.४६% पर्सेंटाइल
गलांडे शुभम ९६.४३% पर्सेंटाइल

ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेत देखील दैदीप्यमान यश मिळवले असून यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-

दिक्षित गौरव - ६४३
जाधव श्रुती - ६३०
चवरे स्वप्निल - ६१५
आंधळे प्रज्ञा - ५९४
पवार माधवी – ५९०
राठोड आकांक्षा – ५७६
वानरे निकिता – ५१२
पाटील आएशा – ५१०

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीमती सिंधुताई शिक्षण प्रसारक संस्था मलकापूर चे अध्यक्ष मोहन वसंतराव पाटील, ब्रिलियंट अकॅडमी कराड चे डायरेक्टर व संस्थेचे सचिव आदित्य रंजन सर, कॉलेजच्या मुख्याध्यापिका रूपाली मोहन पाटील, केमिस्ट्रीचे एच.ओ.डी निलेश कुमार सर, जितेंद्र सुहासिया सर, स्वप्नील अगरवाल सर, विकास पाटील सर, अमन सिंग सर यांनी अभिनंदन केले आहे.

    आय.आय.टी मधील प्रवेशाची हमखास परंपरा असणाऱ्या ब्रिलियंटचे विद्यार्थी दरवर्षी आय.आय.टी. मध्ये प्रवेश मिळवतात. व जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाची रँक देखील ब्रिलियंटद्वारेच दिली जाते. 

    आपल्या पाल्याच्या हमखास निकालासाठी त्यांना ७वी पासून फाऊंडेशन बॅचेस मध्ये प्रवेश निश्चित करावा. दर शनिवार व रविवार या बॅचेस चालवल्या जातात. तसेच जेईई व नीटच्या मोफत रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत. तसेच जे.ई.ई., नीट, आर्किटेक्चर, एन.डी.ए., सीईटी इ. साठी स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातात. मागील दोन वर्षातील कोरोना संकटाची पार्श्वभूमी पाहता जे.ई.ई ॲडव्हान्सड व नीट रिपीटर साठी मोफत बॅचची सोय ब्रिलियंटद्वारे करण्यात आली आहे. याचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.