कराड: खा.श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करताना मारुतीराव मोळावडे व इतर मान्यवर.
सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.श्रीनिवास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाली आहे.
या निवडी बद्दल जनसहकार परिवाराच्या वतीने खा.श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे (दिशा) सदस्य आणि तळमावले (ता. पाटण) येथील जनसहकार निधी लिमिटेडचे संस्थापक मारुतीराव मोळावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.या वेळी मारुतीराव मोळावडे यांच्यासह अमोल मोरे, सुनील आडावकर, काशिनाथ जाधव आणि जनसहकारचे संचालक मंडळ उपस्थित होते.
या वेळी बोलताना मारुतीराव मोळावडे म्हणाले की खा.श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला एक सक्षम, अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व लाभले आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या या नेतृत्वाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अनेक समस्या व प्रश्नांची सोडवणूक झाली असून जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्याचे काम खासदार श्रीनिवास पाटील करत आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थापित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रभावी काम सुरू आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांचे जिल्ह्याच्या विकासातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील योगदानाची दखल घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रफुल्ल पटेल व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे ते निश्चितपणे सोने करतील. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी जनसहकार निधी लिमिटेडचे संस्थापक मारुतीराव मोळावडे यांच्या माध्यमातून ढेबेवाडी व तळमावले विभागात सुरू असलेल्या सहकार व सामाजिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.