श्री मळाईदेवी शिक्षण संस्था मलकापूरचा विद्यार्थी रविराज सुतार याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित आ.च. विद्यालय व आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या खेळाडूचा गौरव म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच नुकत्याच नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियमवर संपन्न झालेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत रविराज सुतार याने हेक्झॅॅथलॉन या क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा व त्याच्या पालकांचा सत्कार नुकता संपन्न झाला.

          रविराज सुतार याचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात यांचे हस्ते व आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक दिलीप चिंचकर, सौ अरुणा कुंभार यांचे प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पुढील गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

      सत्कार प्रसंगी बोलताना शेती मित्र अशोकराव थोरात म्हणाले की खेळामुळे शारीरिक हालचाली होतात व त्यामुळे आपण व्याधी मुक्त होतो.हे व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून दिले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अरुणा कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन श्री शरद तांबवेकर यांनी केले उपस्थितांंचे आभार श्री डी व्ही.कवळे यांनी मानले.