महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ करण्यात आले.
काढणे वांग नदीवरील पुलाची दुरुस्ती करणे २० लक्ष रुपये, खळे ते काजारवाडी ग्रामा ३२२ रस्ता सुधारणा करणे १० लक्ष, शिद्रुकवाडी ते डूबलवाडी रस्ता २० लक्ष, खळे ता पाटण येथील वांग नदीवरील पुलाची दुरुस्ती करणे २०लक्ष, गुढे शिबेवाडी खालची ता.पाटण जोडरस्ता १५ लक्ष, मान्याचिवाडी (गुढे) पोहोच रस्ता सुधारणा करणे २५ लक्ष, वायचळवाडी ता.पाटण येथील रस्ता सुधारणा व संरक्षक भिंत बांधणे १५ लक्ष. कुंभारगाव ता.पाटण समाज मंदिर शेजारील संरक्षक भिंत बांधणे २० लक्ष. या सर्व कामांचा भूमिपूजन समारंभ मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पाटणकर, उप सरपंच राजेंद्र चव्हाण,माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, वि. का. स सेवा सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, व्हा. चेअरमन शशिकांत कीर्तने, माजी चेअरमन भिमराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण(बापू), सोसायटी संचालक राजेंद्र पुजारी, ग्रामस्थ रविंद्र सुपेकर, उदयसिंह चव्हाण, संभाजी चव्हाण, विलास चव्हाण तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी, शंभूराज युवा संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थिती होती.