हिंगणगाव बु. प्राथमिक शाळेचे काम कौतुकास्पद :- जितेंद्र डुडी

माॅडेल स्कूल भेटीअंतर्गत मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना उपक्रमांची माहिती देताना विलासराव आपटे,गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,महेश कदम व मान्यवर.

पुसेसावळी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 हिंगणगाव बुद्रुक प्राथमिक शाळेने "माझी शाळा,आदर्श शाळा"(माॅडेल स्कूल)संकल्पनेत उत्तम कामगिरी केली आहे.भौतिक सुविधा व आनंददायी अभ्यासासह विविध उपक्रमांनी गुणवत्तेत वाढ केली आहे,माॅडेल स्कूलचे काम कौतुकास्पद आहे असे मत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी व्यक्त केले.

हिंगणगाव बुद्रुक प्राथमिक शाळेस त्यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थ व पालकांशी संवाद साधताना ते बोलत होते.गटविकास अधिकारी बी.एस.साळवे,गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,सरपंच रुपाली कदम,उपसरपंच कृष्णत कदम,सागरेश्वर सुतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम,पालक समितीचे अध्यक्ष संतोष कदम,संजय यादव,ग्रा.पं.सदस्य सागर कदम यांची उपस्थिती होती.

जितेंद्र डूडी म्हणाले,मॉडेल स्कूल मोहिमेअंतर्गत हिंगणगाव बुद्रुक ही शाळा आदर्श शाळा आहे.पायाभूत सुविधा सुंदर आहेत.संगणक कक्ष, प्रयोगशाळा,इंग्लिश लॅब,ग्रंथालय यासारख्या सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत आणि आनंददायी शिक्षणासारख्या विविध उपक्रमांचा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयोग होत आहे.

त्यांनी संपुर्ण शालेय परिसर,पोषण आहार व वर्ग पाहणी करत विद्यार्थ्याशी संवाद साधला.विविध उपक्रम व त्यांच्या अंलबजावणीची माहिती विलासराव आपटे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिली.तसेच,माता-पालकांशी संवाद साधून शाळा,भोंगा प्रकल्प,संस्कार वर्गाविषयी माहिती जाणून घेतली.दरम्यान,विलासराव आपटे व विद्यार्थ्यांनी आराधी लोककलेचे सादरीकरण केले.

द इंडीयन एक्सप्रेसच्या उपसंपादक अलिफिया नलवाला,पवन खेंगरे यांनी शाळेची इतंभूत माहिती घेवून चित्रीकरण केले.प्रथम संस्थेच्या मच्छिंद्र पडवळ,राजेश दुधाटे यांनी गुणवत्तेची पाहणी केली.महेश कदम यांनी संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याची व किचन शेडची मागणी केली.या दोन्ही गोष्टींची पुर्तता करण्याची ग्वाही जितेंद्र डूडी दिली.

कार्यक्रमास केंद्रप्रमुख मधुकर जंगम,अध्यक्ष शरद खवळे,ग्रामसेवक एम.आर.खरात,उपअभियंता जी.एच.चव्हाण,अक्षता कोले,विजय काटवटे,युवराज बाबर,रघुनाथ जगदाळे,विलासराव आपटे,महादेव तोडकर,सोनाली हुजरे,निकिता जाधव,शरिफा मुल्ला,विजय गायकवाड,अशोक कदम,ग्रामस्थ व महिला पालकांची उपस्थिती होती.

_______

वाचन संस्कृती वाढावी यासाठी हिंगणगाव बुद्रुक शाळेने सुरु केलेला "भोंगा" प्रकल्प हा उपक्रम कौतुकास्पद असून गावोगावी वाचन चळवळ उभारण्यास दिशा देणारा आहे.

जितेंद्र डूडी, मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.सांगली