अँड. संपतराव चव्हाण यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगाव ता पाटण येथील अँड. संपतराव चव्हाण हे व्यवसायाने वकील असून व्यवसाय निमित्त पंढरपूर येथील कोर्टात वकिली करत असून त्यांना सामाजिक, धार्मिक, राजकीय वारसा आहे. वारसा व समाजसेवेची आवड यातून ते सामाजिक कार्य करत असतात.

 नूकतेच त्यांनी कुंभारगाव विभागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी अँक्वागार्ड वाँटर प्यूरिफायर्स मिनरल गार्डचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थ व शिक्षकांनी कौतुक केले.

   प्राथमिक केंद्र शाळा नं 1,मुलींची शाळा, चाळकेवाडी, चिखलेवाडी, चिचंबा मटेकरवाडी, जांभूळवाडी,बामणवाडी, वरेकरवाडी, शेंडेवाडी, गलमेवाडी, कर्पेवाडी , अशा कुंभारगाव जि, परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या 11 शाळा, नवभारत इंग्लिश मेडीयम, श्री लक्ष्मी देवी हायस्कुल कुंभारगाव, नाईकबा विद्यालय गलमेवाडी या विद्यालयातून परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात या विध्यार्त्याना शुद्ध पाणी मिळावे, या साठी शुद्ध पाण्याचे अँक्वागार्ड वाँटर प्यूरिफायर्स मिनरल गार्डचे वाटप करण्यात आले.

   ग्रामीण भागातील शाळेतील लहान मुलांना शुद्ध पाणी मिळावे व त्यांचे आरोग्य निरोगी राहवे या हेतूने एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी हा उपक्रम राबवला आहे अशी प्रतिक्रिया अँड. संपतराव चव्हाण यांनी दैनिक कृष्णाकाठ शी बोलताना व्यक्त केली. या स्तुत्य उपक्रमाचे शाळा, विद्यालयातून कौतुक व शालेय विध्यर्त्याकडून टाळ्या वाजवून उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. या वेळी श्री लक्ष्मीदेवी विद्यालयाच्या मुख्यध्यापिका कराळे बी, एम,उपशिक्षक घोरपडे एस, के, कुंभार डी, जे, महाबळ ए, पी, लोखंडे एस, एस, करपे एस, यू, 

   जि.प.प्राथमिक शाळा नं 1 व मुख्यध्यपिका चव्हाण उज्वला विकास, उप शिक्षिका अनुराधा माने, मुलींची शाळा कुंभारगाव च्या मुख्याध्यापिका माधुरी पाटील यांचे वतीने अँड.संपतराव चव्हाण,इतर मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी पाटण तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र देसाई,पाटण पं. समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे,गलमेवाडी ग्रा, पं, सरपंच जितेंद्र चोरगे, राजाराम मोरे,प्रदीप देसाई, रमेश तवटे, युवराज चव्हाण, प्रकाश देसाई, पृथ्वीराज चव्हाण, हे उपस्थित होते.