कुंभारगाव ता पाटण येथील वि.का.स सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी, मेळीच्या वातावरणात पार पडली. गेली दोन वर्ष कोविडच्या संसर्गाने वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्या नव्हत्या या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक काही महिन्या पूर्वी पार पडली होती.
या वि. का. स सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि 12/9/2022 रोजी सोसायटीच्या ऑफिस मध्ये पार पडली. यावेळी सभे पुढे 9 विषय ठेवण्यात आले होते त्याचे वाचन संस्थेचे सचिव रत्नाकर देसाई यांनी केले. या वेळी अध्यक्ष निवडीची सूचना सोसायटीचे सभासद व कुंभारगाव ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी मांडली तर उपस्थित विभागीय विकास अधिकारी सुधाकर देशमुख यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले संस्थेचे कर्ज वाटप व वसुली हे दोन्ही संस्थेचे कणे आहेत त्या बाबत आपणास अभ्यास करावा लागेल थकबाकी बाबत बहूतांशी संस्थेमध्ये मध्ये थकबाकीची लागण जास्तच प्रमाणात दिसते त्या बाबत प्रबोधन, मार्गदर्शन होणे गरजेचे आहे मग एखादा म्हणतो मी एकटा थकलो तर काय होतंय अशा सभासदाची बेरीज हळू हळू वाढत जाते त्याचा परिणाम संस्थेच्या प्रगतीला मारक ठरतो याचा परिणाम सभासद लाभांश मिळण्यापासून वंचित राहतो थकबाकी वसुली शंभर टक्के होणे गरजेचे आहे. केवळ पिक कर्ज भरणे,पिक कर्जाचे वितरण करणे यावर संस्था चालवणे उचित नाही. पिक कर्ज नियमित भरल्यावर त्याचे खात्यावर व्याज जमा होते व त्याचे कर्ज कमी टक्क्यावर येते याबाबत सभासदांना मार्गदर्शन करणे. एकाद्या आर्थिक दुर्बल सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बँक सोसायटी मार्फत कर्ज देते. याकरिता पहिले 3 वर्ष हप्ता नसतो. बँक बँकेच्या व्याजातून तुम्ही भरलेल्या व्याजातून परतावा देते. निव्वळ थकबाकीमुळे चांगला मुलगा शिक्षणा पासून वंचित राहू शकतो सद्या सोसायटीचे कामकाज ऑनलाईन झाले आहे आपली थकबाकी ऑनलाईन दिसते याची नोंद सभासदानी घ्यावी आपले कर्ज थकीत राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी व आपली सोसायटी कशी नावारूपाला येईल यासाठी प्रयत्नशील राहावे.
यावेळी उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.यावेळी सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, व्हा. चेअरमन, शशिकांत कीर्तने, माजी, चेअरमन भिमराव चव्हाण,बा,दे,सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, सचिव रत्नाकर देसाई, विभागीय विकास अधिकारी सुधाकर देशमुख, वसुली अधिकारी आर, आर, मोरे, विकास अधिकारी ए, एम, यादव, संचालक तुकाराम धुमाळ, बाबासो चव्हाण, भरत चाळके, देसाई जगन्नाथ, राजेंद्र पुजारी, जगन्नाथ बोर्गे,आनंदा माटेकर, रमेश यादव,जगूबाई सुर्वे, शालन धडम सर्व संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.