ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी भारतातील सर्वोतम आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्रवेशास पात्र.


गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सौ. रूपाली मोहन पाटील, आदित्य रंजन सर, निलेश सर इ. 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ब्रिलियंट अकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराड च्या विद्यार्थ्यांनी जेईई पेपर २ आर्किटेक्चर् परीक्षेत अतिशय उज्ज्वल् यश संपादन केले आहे. आयुष पाटील या विद्यार्थ्याने ९९.१२८ पर्सेंटाइल मिळवून ऑल इंडिया रँक ६८ मिळवली आहे. प्रियांशू सावंत या विद्यार्थ्याने ९५.६८१%पर्सेंटाइलस‍ह ऑल इंडिया रँक १२७ मिळवली आहे. श्रीपाल राठोड या विद्यार्थ्यांने ९५.१२७% पर्सेंटाइल, त्यांचा एस.पी.ए. भोपाळ, दिल्ली मधील प्रवेशाचा मार्ग निश्चित झाला आहे. या यशाबद्दल कॉलेज च्या प्रिन्सिपल सौ. रुपाली मोहन पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहन वसंतराव पाटील, संस्थेचे सचिव व अकॅडमी चे डायरेक्टर, आदित्य रंजन सर व केमेस्ट्री एच ओ डी, निलेश कुमार सर, अगरवाल सर, जितेंद्र सर, अभिषेक सर, विकास पाटील सर, यांनी अभिनंदन केले आहे.

         आर्किटेक्चर क्षेत्रात जेईई पेपर २ व नाटा या दोन परीक्षा असून त्यांच्या उत्तम तयारीसाठी ब्रिलियंट अकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे अतिशय उत्तम सोय असून स्वतंत्र बॅच चालवली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक क्षमता लक्षात घेवून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करण्याची संधी मिळावी म्हणून ब्रिलियंट कॉलेज तर्फे जेईई, नीट, आर्किटेक्चर्, एन.डी.ए, एम.एच. टी. सीईटी इ. स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातात. एन.डी.ए परीक्षेच्या तयारीसाठी स्वतंत्र बॅच चालवली जात आहे. आठवी ते दहावी जे.ई.ई व नीट फाउंडेशन, एन.टी. एस. ई. बॅच, अकरावी व बारावी इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू आहे. तसेच जेईई ॲडव्हान्सड, नीट, व आर्किटेक्चरच्या मोफत रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत. त्याचा लाभ पालकांनी आपल्या पाल्यासाठी घ्यावा असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.