सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबध्द : खा.श्रीनिवास पाटील


राजाचे कुर्ले :विविध विकासकामे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील,आमदार बाळासाहेब पाटील व मान्यवर

पुसेसावळी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

     केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते, वीज, नळपाणीपुरवठा योजना यासह विविध विकासकामे तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असुन सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असून गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. स्थानिक विकासासह नागरिकांच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

राजाचे कुर्ले (ता.खटाव) येथे विविध विकासकांमाच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, सुरेशबापु पाटील, हणमंत भोसले, सी.एम.पाटील, दत्तात्रय रुद्रुके, बबनराव कदम,भाग्यश्री भाग्यवंत,सरपंच समरजीतराजे भोसले,उपसरपंच आशा माने, श्रीरंगशेठ माने, संग्रामसिंहराजे भोसले,अनिल माने यांची प्रमुख उपस्थिती होती

खा.पाटील पुढे म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून राजाचे कुर्ले, तीर्थक्षेत्र गिरिजाशंकरवाडीच्या विकाससाठी सहकार्य करणार असून यापुढील काळात विविध विकासकामांच्या माध्यमातुन ताकद देऊन गावच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, भाग्यश्री भाग्यवंत, सी.एम.पाटील, सुहास पिसाळ, सरपंच समरसिंहराजे भोसले आदिंची भाषणे झाली.

कार्यक्रमास आशुतोष माने,पै.बापूसो माने, छन्नूसिंग पाटील,बळीराम माने,शंकर घोरपडे, अशोक माने, डी.के.माने, तुकाराम माने, आबासो माने, किशोर माने, दिनकर गावडे, शिवाजी कोकरे, वामन पावशे,लक्ष्मण जगदाळे,अधिक डुबल, प्रफुल्ल शेडगे, प्रकाश माने, शिवाजी जगताप, आबासाहेब माने, अरुणा माने,शुभांगी माने,सुजाता शेडगे, शांता कोळी,आदिसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.आभार अनिल माने यांनी मानले.