800 मी धावणेच्या स्पर्धेत तनुजा आचरे आणि अमृता डाकवे यांचे यश

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

मारुल हवेली (ता.पाटण) येथील श्री समर्थ कृपा करीअर अकँडमी मध्ये मुलींच्या 800 मीटर धावणेची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कु.तनुजा केशव आचरे हिने व्दितीय तर अमृता तानाजी डाकवे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावत उज्जवल यश संपादन केले आहे.

या दोघीही काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले व मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन संचलित सह्याद्री वॉरियर्स करिअर अकँडमी तळमावले मध्ये शिकत आहे.  

मारुल येथील श्री समर्थ कृपा अकॅडमीचे सुभेदार शंकर जाधव, सारंगबाबा श्रीनिवास पाटील (अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष) व अन्य मान्यवर यांच्या हस्ते कु.आचरे तनुजा हिला रू.5,000/- रोख रक्कम, पदक व सन्मानचिन्ह तसेच कु.अमृता डाकवे हिला देखील प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

या यशस्वी विद्यार्थींनीचे प्राचार्य डॉ.अरूण गाडे, अकँडमीचे मार्गदर्शक प्रा.पै.अमोल साठे प्रशिक्षक पै.प्रफुल्ल पाटील, प्रा शिवराज पाटील यांनी अभिनंदन केले. 

Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज