“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेच्या लाभासाठी दि.14 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करून घेण्यास मुदतवाढ : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


सातारा,दि.10 : “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी कार्यवाहीचे काम पूर्ण करण्यासाठी दि.14 सप्टेंबर 2022 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

 जे शेतकरी दि.14 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करणार नाहीत, त्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होणार नाही.तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी दि.14 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करून घेण्यात यावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.