मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तसेच काही गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना हया जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत.त्यामुळे या गावांमध्ये विशेषत: उन्हाळयात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने पाटण तालुक्यातील विविध नळ पाणी पुरवठा योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश होणेकरीता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील सुचविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचा जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश करण्यात येऊन यामधील आत्तापर्यंत 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

          पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील विविध नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारशी करत या योजनांना मंजूरी मिळण्याकरीता राज्य शासनाकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण तालुक्यातील तब्बल 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी राज्य शासनाकडून आत्तापर्यंत मंजूर करण्यात आला आहे.या नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये नुने 115 लक्ष, पाळशी 14.94 लक्ष,कामरगाव 24.25 लक्ष,मानाईनगर 18.76 लक्ष, डोणीचावाडा वांझोळे 33 लक्ष,भारसाखळे 12.33 लक्ष, विठ्ठलवाडी शिरळ 9.90 लक्ष,जळव 24.96 लक्ष,सदुवर्पेवाडी 14.96 लक्ष,निगडे 24.05 लक्ष,चाळकेवाडी 18.64 लक्ष,पाडळोशी ,तावरेवाडी,मसुगडेवाडी 43.10 लक्ष,पांढरेपाणी आटोली 99.28 लक्ष,गव्हाणवाडी 67.39 लक्ष,रुवले 55.78 लक्ष,ऊरुल 51.40 लक्ष,गलमेवाडी 83.37 लक्ष,चाफळ 163.26 लक्ष,काहिर 50.31 लक्ष,चव्हाणवाडी धामणी 14.97 लक्ष,लोटलेवाडी काळगाव 22.01 लक्ष, शिद्रुकवाडी काढणे 27.46 लक्ष,करपेवाडी काळगाव 48.46 लक्ष, मसुगडेवाडी दाढोली 29.86 लक्ष,मरळोशी 30.18 लक्ष,आंबवडे खुर्द 80.11 लक्ष,कडवे खुर्द रेडेवाडी 80.04 लक्ष, वाटोळे 14.30 लक्ष,मरळी 24.97 लक्ष,आंबळे 24.95 लक्ष,आवर्डे 21.56 लक्ष,कळकेवाडी 15.92 लक्ष,काटेवाडी तारळे 24.49 लक्ष,कुठरे 24.67 लक्ष,घोटील वरचे 24.68 लक्ष,जमदाडवाडी 21.09 लक्ष,तामकडे 24.07 लक्ष,तामकणे 24.90 लक्ष,नवजा कामरगाव 22.27 लक्ष, भुडकेवाडी 24.95 लक्ष,मिरगाव कामरगाव 24.96 लक्ष, वर्पेवाडी सळवे 18.86 लक्ष,वाघणे तळोशी 24.77 लक्ष, शेडगेवाडी 24.10 लक्ष,निवडे पुनर्वसन 23.65 लक्ष,गोषटवाडी 40.82 लक्ष, मुरुड 42.41 लक्ष,सांगवड 40.43 लक्ष,आंबेघर तर्फ मरळी 27.17 लक्ष,जानुगडेवाडी 27.92 लक्ष,उधवणे 36.62 लक्ष,राहुडे 21.57 लक्ष, कोळेकरवाडी डेरवण 75.05 लक्ष,गवळीनगर (कोकीसरे) 20.58 लक्ष, बाचोली 39.96 लक्ष, बनपूरी 197.52 लक्ष, बोडकेवाडी 35.23 लक्ष,केमसे ढाणकल 5.90 लक्ष, चिटेघर 13.11 लक्ष,चौगुलेवाडी सांगवड 13.32 लक्ष, जरेवाडी 4.99 लक्ष, जाईचीवाडी बोंद्री 4.48 लक्ष,दिक्षी धावडे 11.19 लक्ष,मळा काढोली 14.47 लक्ष,मालदन 14.87 लक्ष,शेंडेवाडी 9.10 लक्ष,हावळेवाडी 7.56 लक्ष,आबदारवाडी 8.62 लक्ष,करपेवाडी तळमावले 8.74 लक्ष,सळवे 14.97 लक्ष, गोठणे 12.03 लक्ष,गोवारे 7.74 लक्ष,चोपदारवाडी 7.99 लक्ष,ढोकावळे नाव 8.21 लक्ष,पिंपळोशी 14.97 लक्ष, बनपेठवाडी 10.93 लक्ष, बोर्गेवाडी सळवे 13.01 लक्ष,सोनवडे 14.37 लक्ष, हुंबरवाडी 3.09 लक्ष,मुरुड गोरेवाडी 14.38 लक्ष, दुसाळे 13.56 लक्ष,पाबळवाडी 7.47 लक्ष, एकावडेवाडी सळवे 14.98 लक्ष,मराठवाडी दिवशी खुर्द 8 लक्ष,विठ्ठलवाडी सणबूर 14.89 लक्ष,दिवशी खुर्द 7.37 लक्ष,सिध्देश्वरनगर चोपदारवाडी 5.92 लक्ष,हुंबरणे 12.58 लक्ष,खिवशी 14.97 लक्ष,टेळेवाडी 14.92 लक्ष,नाव 4.24 लक्ष,मराठवाडी 9.60 लक्ष,घाणबी 13.97 लक्ष,तामिणे 12.74 लक्ष,साईकडे 197 लक्ष या योजनांचा समावेश आहे. तसेच धावडे,टोळेवाडी,वजरोशी,नहिंबे चिरंबे,फडतरवाडी घोट, ताईगडेवाडी, पाचगणी, काळोली,आवसरी काठी,कातवडी, मारुल तर्फ पाटण,मरड,किल्ले मोरगिरी,झाकडे बौध्दवस्ती, गोकूळ तर्फ पाटण, सडावाघापूर, जाळगेवाडी, कोकीसरे, मोरेवाडी कुठरे, माथणेवाडी महिंद व महिंद स्टॉप, रामेल, गणेवाडी ठोमसे, दिवशी बु.,गारवडे,जंगलवाडी जाधववाडी, बेंदवाडी, माळवाडी, सवारवाडी,धामणी, काळगाव,लोहारवाडी काळगाव,मस्करवाडी, सतिचीवाडी, धनगरवाडा कसणी,सलतेवाडी, डाकेवाडी वाझोली, ठोमसे या गावांतील योजनांचे अंदाज पत्रक तयार करण्यात येऊन तांत्रिक मान्यतेकरीता सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करुन या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी अशा सूचना मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे शेवटी पत्रकांत नमूद केले आहे.