राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावासातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन 2022-23 मधील मंजूर तरतुदीनुसार दायित्व वजा जाता किती रकमेची कामे घेण्यास वाव आहे याबाबतची माहिती तयार करणे तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रम आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामधील आमदार महोदय यांनी सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांचा आढावा

राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. पाटण विधानसभा मतदार संघातील जी रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे. ज्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.

तारळी धरण उपसा सिंचन योजनांचा आढावा 

तारळी धरण प्रकल्पांतर्गत 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांच्या मंजूर कामांची सद्यस्थिती व प्रलंबित इतर कामांचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला. उपसा सिंचन योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केल्या.
Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज