कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कुंभारगाव ता पाटण येथे अमृत महोत्सव च्या पार्श्ववभूमीवर "हर घर तिरंगा "अभियानाअंतर्गत

  कुंभारगाव येथील श्री लक्ष्मी देवी हायस्कुल, प्राथमिक जि, प, प्राथमिक केंद्र शाळा नं 1,व जि, प, प्राथमिक शाळा कुंभारगाव मुली विध्यार्त्यानी जनजागृती प्रबोधन रॅली काढण्यात आली या वेळी वेगवेगळ्या वेषभूषा परिधान करण्यात आलेले विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरले होते पावसाची रिप रिप चालु असताना न थांबता विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग घेतला ढोल ताशाच्या गजरात प्रबोधन रॅली हायस्कुल व प्राथमिक शाळे पासून बाजारपेठ मार्गे गावातील गल्लीतुन काढण्यात आली.

   यावेळी ग्रामस्थांना 'हर घर तिरंगा 'या उपक्रमाविषयी हायस्कुल, शाळेच्या मुख्याधिपिका शिक्षक यांनी देशभक्ती व राष्ट्रप्रेमासाठी 'हर घर तिरंगा' दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत प्रत्येकाने आपल्या घरावर "तिरंगा "ध्वज फडकवून राष्ट्राभिमान बाळगावा असे मार्गदर्शन ग्रामस्थ व नागरिकांना केले. 

 


  या वेळी विद्यालयात वकृत्व स्पर्धा, वाचन, गायन, निबंध स्पर्धा, चित्रकला, व्याख्यान, अभियान राबवले गेले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

   या 'हर घर तिरंगा 'रॅलीत हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ कराळे मॅडम, सौ लोखंडे मॅडम,महाबळ सर, घोरपडे सर, कुंभार सर, करपे सर, जि,प,प्राथमिक केंद्र शाळा कुंभारगाव नं 1 व जि, प, प्राथमिक शाळा कुंभारगाव शाळेच्या मुख्याध्यपिका सौ उज्वला चव्हाण मॅडम, शिक्षिका माधुरी कोळी, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी या 'घर घर तिरंगा 'जनजागृती रॅलीत सहभाग घेतला होता.