मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यात केले स्वागत


सातारा दि. 11 (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी सारोळा ब्रिज, शिरवळ जि. सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन केले.तसेच मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

 या प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यात आली.